सुखी जीवनाचा शोध प्रत्येकाने घ्यावा

लाइफस्टाइल

सुखी जीवनाचा शोध प्रत्येकाने घ्यावा
आपली सावली आणी आपण हे आपल्या जीवनातील परमसत्य. आपली सावली आपल्या वयाप्रमाणे वाढत जाते, आकार धारण करते; परंतु ती सावली आपल्याला कोठेही सोडून जात नाही. ती जन्माला येतानाच सोबत येते आणि सोबत जाते सुद्धा.
  ही सावली आपल्या कर्माची साक्षीदार असते. या सावलीला दुसऱ्या सावलीत मिसळायला आवडतं. अशी सावली दुसऱ्या सावलीत मिसळली कि परिवर्तनाचा एक सुंदर धागा गुंफला जातो आणि दोन सावल्यांपासून अनंत सावल्या जन्माला येतात.

आणि याच जगात आपणही घेऊन वावरत असतो एक सावली. तिची ओळख आपणाला केव्हाही होत नाही. आत्मविभोर जन्माला एक प्रयोजन स्वीकारावं लागतं ते याच सावलीसोबत; परंतु सावल्यांच्या खेळात  हरवून आपण स्वत:च नशीब गहाण टाकत असतो.

या शरीराकडून घडणारी वरवरची कर्मे प्रपंच स्थापन करतात. लौकिक व्यवहार घडवतात. राजकारणातल्या विविधांगी शैलींचा खेळ मांडतात. समृद्ध जीवनाला नको असताना राख फासतात. दारूने शरीराची हानी होते. तंबाखू, सिगारेटने कॅन्सर होतो. हे माहित असूनही मनुष्य ह्या सवयी वारंवार जपतो. पैशांसाठी, पैशांच्या वाढीसाठी वाट्टेल ती कामे करतो. संसारात मने विस्कटली कि मुलांबाळांना, बायकोला रक्ताच्या पाटात वाहून टाकतो. प्रचंड आणि प्रचंड वाईट कर्मे करून आपणच आपला मोकळा श्वास कोंडून टाकतो. ज्याचा परिणाम तुरुंगाच्या भिंतीशी सोसण्यास होतो.

सुखी जीवनाचा शोध प्रत्येकाने घ्यावा
सुखी जीवनाचा शोध प्रत्येकाने घ्यावा

हि सारी कर्मे आपली सावली निमुटपणे पाहत असते. जीवनातील परम सत्य अलौकिक सृष्टी आहे आणि त्या सृष्टीला निर्माण करणारा ईश्वर आहे.
आज ह्या ईश्वराला मानायला लोक तयार नाहीत. जे मानतात ते ईश्वराला भरपूर काही मागतात. त्यासाठी ईश्वरालाच लाच द्यायलाही कमी करीत नाहीत.
देव तू मला पाव, मी तुला नारळ फोडीन, पेढे वाटीन…वगैरे नवस करून देवांनाच माणसांनी लाललुचपतीच्या कठड्यात उभं केलं आहे. देव ही संकल्पना   साऱ्या जगाला व्यापून उरली आहे. देवाला तुमच्याकडून नारळ, पेढे नको. त्याला हवं आहे फक्त तुमचं निर्मळ मन, तुमचे विनयाने जोडलेले हात आणि भुकेला भाव. संधीकाली प्रकाशात जीवनातील परमसत्य अनुभवायचं असेल, तर दिव्याच्या ज्योतीतल्या तांबूस रंगाचा साठा डोळ्यात साठवा. एक दिवस त्याच तांबूस रंगात साऱ्या जन्माचे सर नष्ट होणार आहे हे जाणा. हेच आहे जीवनातील परमसत्य. हे परमसत्य झडप मारण्याअगोदर आनंदी, सुखी जीवनाचा शोध घ्या म्हणजे तुम्हासहित ती सावलीही हसेल.

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.

Leave a Reply