इतरांचा विश्वास मिळवण्यासाठी जोपासा आत्मविश्वास
काही माणसे स्वत: विषयी फाजील विश्वास बाळगतात. क्षमता नसूनही स्वत:चा टेंभा मिरवत राहतात. अशी माणसे क्षमता असूनही आत्मविश्वासाअभावी खचलेल्या व्यक्तींचा वापर करून घेऊन त्याच्या कामाचे श्रेय हडपत असतात व त्याविरुद्ध तक्रार करण्याइतपतही
बळ आत्मविश्वास हरवलेल्या माणसांमध्ये नसते. अशी माणसे जेव्हा स्वत:च स्वत:च्या कामाबद्दल, क्षमतेबद्दल खात्री देत नाहीत तेव्हा लोकही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतात व त्यामुळे त्यांची हुशारी व क्षमता जगापुढे येत नाही व यश त्यांच्यापासून दूर जात राहते.
जर आपल्याला जगापुढे आपले कौशल्य, आपली हुशारी, आपली क्षमता प्रदर्शित आणि सिद्ध करायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम स्वत:वर व स्वत:च्या क्षमतेवर विश्वास राखायला हवा. तरच इतर माणसे आपल्यावर विश्वास ठेवतील. कर्मचाऱ्याला आपल्या कौशल्यावर, अनुभवावर, प्रशिक्षणावर, ज्ञानावर विश्वास असायला हवा. तरच तो त्याच्यावर सोपवलेले काम पूर्ण करू शकेल. आत्मविश्वास हि यशाकडे घेऊन जाणारी उर्जा आहे. आपल्या शरीराला व मनाला बळ देणारी पौष्टिकता आहे.
काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.