आहारातून मिळवा आरोग्य
उतारवयात ऋतुबदलाचा अधिक त्रास होतो तो टाळता येण शक्य नसल तरी त्याची तीव्रता कमी करता येते. रोजच्या आहारातील बदलही यात उपयोगी ठरतो. रताळ्यामध्ये मेद वाढविणारे घटक फार कमी असतात. शिवाय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही
रताळे मदत करते. या दिवसांत रताळ्याचे सेवन केल्यास साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. आवळा, संत्रे हि थंडीच्या दिवसांत येणारी फळे. त्यांतील ‘क’ जीवनसत्व सर्दीपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
मोसमी फळे आवर्जून खायला हवीत. डाळींबामध्येही ‘अ ‘ आणि ‘क’ जीवनसत्वे असतात. त्वचेसाठी ते फार उपयुक्त असते. डाळींबाच्या बिया वाटून त्यांच्या लेपाचा स्क्रब म्हणून वापर करता येतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही डाळींबाच्या रसाचा वापर होतो . रोजच मधाचा वापर केला पाहिजे. या दिवसांत त्वचा कोरडी पडते. त्यावर उपाय म्हणून आहारात तूप, लोणी असे पदार्थ घ्यावेत.