आरोग्य यशाचे रहस्य

आरोग्य ज्ञान
 • चांगले स्वास्थ्य हे चांगले जीवन, भविष्य  तसेच यशाची गुरुकिल्ली आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी काही सावधानी घेणे जरुरीचे आहे.
 • नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक वृत्ती यांचा अवलंब करून तंदुरुस्त राहाता येईल. यासाठी काही टिप्स
 •  आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या नियमित प्रात: भ्रमणाने करावी. प्रात : भ्रमण अनेक आजारांपासून बचाव करण्यास सहायक आहे.
 • संधिवात, हृदयरोग, मधुमेह, स्नायुंमधील ताण यांसारखे आजार नियमित पायी चालण्याने दूर राखले जाऊ शकतात.
 •  धुम्रपान  हानिकारक आहे. यामुळे कॅन्सरसारखा प्राणघातक रोग होऊ शकतो. थोडीशी सावधानी घेऊन यापासून बचाव केला जाऊ शकतो.
 • आरोग्य यशाचे रहस्य
  आरोग्य यशाचे रहस्य
 •  धुम्रपान करणारया लोकांना फुफ्फुसांचा कन्सर होण्याची शक्यता असते, तर तंबाखूने तोंडाचा कन्सर होऊ शकतो. म्हणूनच धूम्रपानापासून दूर राहावे.
 •  हृदयरोगाच्या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे मुख्य कारण आहे अत्याधिक तणाव आणि अनियमित खानपान.
 •  तणावामुळे अनेक आजार होतात. यापासून बचावासाठी योग आणि व्यायाम नियमित करावेत. ध्यानानेही तणाव दूर केला जाऊ शकतो.
 •  आपले खानपान संतुलित असणे जरुरी आहे. तळलेले , चटपटीत , मसालेदार खाद्यपदार्थ हे सीमित मात्रेतच घ्यावेत.

Leave a Reply