अर्धशिशीच्या आजारात काय करावे ?

आरोग्य ज्ञान

आजकाल अर्धशिशीचा आजार सामान्य होत चालला आहे. या आजारामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागामध्ये असह्य वेदना होतात .
अर्धाशिशीच्या इलाजामध्ये काही घरगुती उपाय करता येऊ शकतात . ते पुढील प्रकारे
१) हिंग पाण्यामध्ये मिसळून हुंगावे याने अर्धशिशीमध्ये आराम मिळतो.
२ ) रुग्णाला अर्ध चमचा मधामध्ये एक चिमुटभर मीठ मिसळून चाटायला द्यावे.

अर्धशिशीच्या आजारात काय करावे ?
अर्धशिशीच्या आजारात काय करावे ?

३ ) जसजसा सुर्य वर येत जातो. तसतसे अर्धशिशी वाढत असेल तर रोग्याला सुर्यादयापुर्वी गरम दुधाबरोबर जिलेबी खाऊ घालावी.
४) थोडेशे तूप घेऊन त्यामध्ये दुप्पट मात्रेमध्ये गूळ मिसळावा आणि सकाळच्या वेळी रोग्यास खाऊ घालावे.
५) बारा ग्रॅम काळे मिरे खाऊन त्यानंतर ३० ग्रॅम देशी शुद्ध तूप प्यावे. याने लाभ होतो.
६) सुंठ पाण्यामध्ये वाटून, गरम करून, डोक्यावर लेप करावा याने लाभ होईल .
७) डोक्यावर सरसोच्या तेलाची  मालिश करण्याने तत्काळ आराम मिळतो.
८) अर्धाशिशीच्या रुग्णाने मानसिक तणाव, अत्याधिक  श्रम व मलावरोध यापासून बचाव करावा. तळलेले पदार्थ आणि चहा – कॉफी इत्यादींचे अत्याधिक सेवनही वर्ज्य .

Leave a Reply