अनेक रोगात लाभदायक जायफळ

आरोग्य ज्ञान
 • जायफळ हे एक असे उपयोगी फळ आहे. ज्याचा घरगुती उपायांसाठी उपयोग केला जातो. याच्या उपयोगाने अनेक रोगांत लाभ मिळतो.
 •  डोकेदुखी दूर करण्यासाठी शुद्ध कच्च्या दुधामध्ये जायफळ उगाळून माथ्यावर लेप करण्याने फार आराम मिळतो.
 •  तोंडातील चकत्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी जायफळाचा काढा बनवून गुळणा करावा.
 • जायफळाचे चूर्ण सकाळ, संध्याकाळ खाण्याने पोटदुखीमध्ये आराम मिळतो. कफ तसेच वाट यांचे शमन करण्यासाठी जायफळाचे चूर्ण उपयोगी आहे.
 • उचकीवर नियंत्रण आणण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांबरोबर जायफळाचे बारीक तुकडे तोंडामध्ये चावावेत. उचकी त्वरित बंद होते.
 • अनेक रोगात लाभदायक जायफळ
  अनेक रोगात लाभदायक जायफळ
 • थंडीच्या दिवसांतील आजार दूर करण्यासाठी दोनशे ग्रॅम गरम दुध आणि अर्धा ग्रॅम जायफळाचे चूर्ण फेटावे
 • जायफळ मिश्रणयुक्त दुध पिण्याने सर्दी-पडसे त्वरित दूर होते.
 •  अधिक वयाच्या स्त्रीपुरुषांना अतिसार होत असल्यास जायफळाचे चूर्ण एक ग्रॅम अर्धा ग्लास पाण्याबरोबर फक्की मारून सकाळ संध्याकाळ घेण्याने आराम मिळतो.
 • पाच ग्रॅम आवळ्याच्या पावडरमध्ये पाच ग्रॅम जायफळाची पावडर मिसळून रात्रभर लोखंडाच्या पात्रामध्ये पाण्याबरोबर भिजत घालावे सकाळी हा लेप केसांवर चोळावा याने केसांची चमक वाढते. व केस काळे होतात.
 • जायफळ  शुद्ध तुपामध्ये  उगाळून डोळ्यांच्या पापण्यांवर लेप करून डोळे बंद करून झोपण्याने चांगली झोप येते. डोळ्यात जाऊ नये याची खबरदारी घ्यावी.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ रात्री ( Good Night Messages Marathi  ) शुभेच्छांचा खजिना. ५०००+ पेक्षा जास्त शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी.

Leave a Reply