आपल्या जीवनाचे नियंत्रण स्वत:कडेच ठेवावे

लाइफस्टाइल

आपले जीवन आपल्याच ताब्यात असेल तरच आपण जीवनात ध्येय प्राप्त करू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम जीवनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्‍न करावा.
जीवनावर आपले नियंत्रण असणे अत्यावश्यक असते. परंतु अशी कोणती गोष्ट असते ?  कि ज्यामुळे बहुतेक आपण जेव्हा स्वत:चे जीवन, व्यक्तिमत्त्व उलगडून बघण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा वेगवेगळ्या घटकांचा त्यावर प्रभाव पडलेला दिसून येतो.
या प्रभावाचा पगडा इतका असतो कि आपले जीवन त्याच्याच नियंत्रणाखाली आलेले असते. खरेतर हे चुकीचे आहे. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

आपल्या जीवनाचे नियंत्रण स्वत:कडेच ठेवावे
आपल्या जीवनाचे नियंत्रण स्वत:कडेच ठेवावे

कारण त्यामुळे संपूर्ण जीवन आणि तुमच्या संगती राहणारे सर्वच लोक नकारात्मक रूपाने प्रभावित होतात.
स्वत:चे परीक्षण करावे- सर्वप्रथम स्वत:चे परीक्षण करणे गरजेचे असते. अशा प्रकारचे परीक्षण करताना तुमचे व्यक्तिमत्त्व आणि जीवनावर कोणाचे नियंत्रण आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्‍न करावा.
त्यासाठी मनातून आलेल्या आवाजाला संपूर्ण प्रामाणिकपणे स्वीकार करावे आणि त्यामधून नकारात्मक उत्तर मिळाले तर त्यावर तत्काळ काम सुरु करावे.
सुधारणेचा पहिला उपाय-  आपल्याला जेव्हा आपण कोणाच्या प्रभावाखाली आलो आहोत? याचे नेमके उत्तर मिळाल्यानंतर त्यापासून कशा प्रकारे नियंत्रणमुक्त होता येईल याचा विचार करावा.
बहुतेकदा  दिसून येते कि, कोणत्याही व्यक्तीवर त्याचे कुटुंब,  नोकरीच तुमच्या जीवनाला दयनीय बनवीत असेल, त्यासाठी तुम्ही त्याच्या प्रभावाखाली इतके कसे आलात. याचे आत्मपरीक्षण करावे.
कुटुंबापासून सुरुवात करावी- तुम्हाला जाणवले कि नोकरीने तुम्हाला कशा प्रकारे नियंत्रित केले आहे. तेव्हा तुम्ही एक नियम तयार करावा कि, ऑफिसमध्ये तुम्हाला ज्या अडचणी येतात, समस्या येतात ,
त्या ऑफिसच्या गेटबाहेर आल्यानंतर सोबत घेऊन येणार नाहीत. भलेही तुम्ही सहकर्मचार्‍यासोबत ऑफिसच्या बाहेर घरी निघाले असाल, परंतु ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर कामाबाबत काहीही बोलणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
तसेच त्याविषयी जराही विचार करणार नाहीत . कोणत्याही परिस्थितीत ऑफिसमधील विचार घरी घेऊन येऊ नयेत. घरच्यांसाठी  असलेला वेळ त्यांच्यासोबत घालवावा,
नाहीतर ऑफिसच्या नियंत्रणातून बाहेर पडणे तुमच्यासाठी अधिकच कठीण बनण्याची शक्यता आहे.
तक्रारीसाठी तयार राहावे- तुम्ही जेव्हा वर दिलेल्या उपायांचा अवलंब कराल. त्यामुळे नोकरीमध्ये तुमच्या अनेक तक्रारी निघणे, हे निच्छितच आहे. त्यासाठी सुरवातीपासून आपणच त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी.
परंतु त्यासाठी भांडू नये . तुम्ही योग्य आहात. त्यासाठी तुम्ही एकदा जे काही सांगितले असेल, त्यावर कायम राहण्याचा प्रयत्‍न करावा. पुढे तुम्हाला दिसून येईल कि काळानुसार हळूहळू समस्या कमी होतील.

Leave a Reply