तणावमुक्त जीवन जगण्यासाठी काही उपाय
तणाव आपण आनंद कमी करत आहे आणि समस्या वाढवीत आहे. त्याचा सरळ-सरळ परिणाम आपल्या स्वास्थ्यावर पडत आहे. पुढे तणावाची कारणे आणि त्यापासून दूर राहण्याचे काही उपाय सुचविण्यात आले आहेत.
त्यांचा अवलंब करून तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकाल आणि आपले स्वास्थ्य चांगल्याप्रकारे राखू शकतात .
१) भूतकाळातील वाईट गोष्टींची काळजी करून आणि भविष्याची विनाकारण चिंता करण्यामुळे आपण आपला वर्तमान वय घालवीत असतो. त्यासाठी भूतकाळ जर चांगला असेल तर त्यापासून प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करावी आणि भूतकाळ वाईट असेल तर तो विसरून पुढील वाटचाल करणेच उत्तम असते.
२) आपल्या उणीवा दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे .कोणताही मनुष्य सर्वगुणसंपन्न असू शकत नाही.आपल्या कमतरता दूर करून चांगल्या गोष्टींचा शोध घेणे गरजेचे असते. हीन भावनांना जवळ केल्यास मनात नकारात्मक भाव निर्माण होतो.
३) दिवसेंदिवस अधिकाधिक प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. प्रसन्न राहिल्याने आणि आनंदी स्वभावामुळे सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होण्यास मदत होते. सकारात्मक विचार जीवनाची जमापुंजी आहे. हसणे शरीरासाठी एक चांगला व्यायाम आहे.
४) शरीर सक्रिय ठेवण्यातच खरा फायदा आहे. सामर्थ्यानुसार शरीराला कामे देणे गरजेचे आहे. त्यामुळे कामे तर होतील त्याशिवाय वाईट विचारदेखील मनात येणार नाही.
त्यासोबत दररोज थोडा-फार व्यायाम करण्याची सवय लावावी . त्यामुळे शरीराची अनावश्यक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल आणि शरीरात चुस्ति- स्फूर्ती कायम राहण्यास मदत होईल.
५) आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला मित्रपरिवार, ओळखीच्या लोकांची मदत घ्यावी. त्यांचा अनुभव आणि चांगल्या गोष्टीचा जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न करावा.
काही समस्या सोडविण्यासाठी घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींची मदत घ्यावी. त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेऊन आपला तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा.
६) आपल्या मनात ठरवून घ्यावे कि कोणते काम असे नाही कि जे आपण करू शकत नाही. त्यासाठी केवळ योग्य विचारांची व त्याही अंमलबजावणी करण्याची आवशक्यता असते.
७) मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे. परंतु चूक झाल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात उशीर करता कामा नये. जीवनात चुकामधून शिकण्याची सवय लावणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतात .
८) जीवनात आपला उद्देश निश्चित करून तो पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारच्या योजना आखाव्यात. आपण जो उद्देश निश्चित करत आहोत, त्याचे लाभ आणि होणारे नुकसान याची नोंद अवश्य करून घ्यावी .
९) स्वत:ला नेहमी व्यस्त ठेवावे. कधीही रिकामे राहू नये. कारण रिकामे डोके सैतानाचे घर असते. तुम्ही रिकामे नसले तर तणाव निर्माण होणार नाही. आपला हा जन्म व्यर्थ घालवू नये तर चांगले कर्म करावे.