व्यायाम करणार्‍यांसाठी योग्य ‘मेनू’

आरोग्य ज्ञान

तुमचा रोजचा आहार हा महत्त्वाचा आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचा आहे तुमचा व्यायामानंतरचा आहार. व्यायाम केल्यावर तुम्ही काय खाता ते महत्त्वाचे आहे. तज्ञ म्हणतात, व्यायामानंतर कॉम्प्लेक्स  कार्बोहायड्रेट्स, पाणी आणि काही प्रोटीन्स , व्यायाम करताना शरीर इंधन म्हणून ग्लुकोजचा वापर करते.
त्यामुळे व्यायाम करून झाल्यावर रक्तातील साखर हळूहळू वाढवील असा आहार पाहिजे. तेव्हा कोणते पदार्थ टाळावेत याची थोडी माहिती पुढीलप्रमाणे .

व्यायाम करणार्‍यांसाठी योग्य ' मेनू'
व्यायाम करणार्‍यांसाठी योग्य ‘ मेनू’

धान्ये-  धान्ये हा एक फसवा प्रकार. हि स्वास्थ्यवर्धक असतात, पण काहींमध्ये साखरेचे प्रमाण फार जास्त असते. त्याऐवजी तुम्ही अर्धा कप कमी साखरेचा ग्रॅनोला  घ्यावा.
त्याच्याबरोबर काही फळे व मेवा. मात्र त्यात बाहेरची साखर नकोच. थोडे स्किम्ड मिल्क चालेल.
अंडी – अंड्यांमध्ये हृदयासाठी उत्तम प्रोटीन आणि कोलाइन विपुल प्रमाणात असतात. व्यायामानंतर हा एक उत्तम आहार आहे. मात्र, अंडी फ्राय करण्याऐवजी उकडून खावीत.
हिरव्या भाज्या- कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर पोषकतत्त्वे असली तरी व्यायामानंतर तुम्हाला ऊर्जावान बनविण्याइतकी ती पुरेशी नसतात. तुम्हाला अधिक प्रोटीन्सची  गरज असल्याने कबुली चणे व दही उत्तम.
पनीर- एक मैल धावल्यानंतर कधीही उच्च फॅटस व प्रोसेस्ड पनीर सेवन करू नये. कारण त्यात स्यॅचुरेटेड  फॅट व मीठ यांचे प्रमाण भरपूर असते. नमकीनच पाहिजे असेलच, तर पनीरचा स्वाद असणारे ‘ क्रिप्स ‘ घ्या.
ब्रेड – ब्रेडमधील स्टार्च एकदम शुगरमध्ये रुपांतरीत होतात, पण ब्रेड खायचा असेल तर व्हाईट ब्रेडऐवजी होल ग्रेन ब्रेड अल्पप्रमाणात सेवन  करावा .
मिल्क शेक – जर हे फ्रुटचे असेल तर त्यात शुगर फार जास्त प्रमाणात असेल त्यामुळे त्याऐवजी बदाम घालून दुध घ्यावे .
फ्रुट ड्रिंक्स – यामध्ये साखरेचे प्रमाण फारच अधिक असते. त्यामुळे त्याऐवजी ‘ आईस्ड हर्बल टी’ व ग्लासभर नारळपाणी घ्यावे. फ्रुट ड्रिंकमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडते .

Leave a Reply