रुद्राक्ष औषधी गुणांनीही परिपूर्ण असतात
रुद्रक्षामध्ये आध्यात्मिक ऊर्जा व अनेक औषधी गुण आहेत. रुद्राक्ष धारण करणार्याला जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत होते. अनेक पुराने व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये रुद्राक्षाचे फायदे व महत्त्व वर्णन करण्यात आले आहे.
एकमुखी रुद्राक्ष – एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे. हा धारण केल्याने मनुष्य चिंतामुक्त व निर्भय बनतो. त्याला कोणतीही शत्रूपीडा वा भय उरत नाही.
नेत्रविकार, डोकेदुखी, हृदयविकार, अस्थिविकार, त्वचाविकार, उदरविकार, उदर या सर्व रोगांवरील उपचारात हा रुद्राक्ष बहुमोल मदत करतो. यासाठी एकमुखी रुद्राक्षांची माळ फार प्रभावी ठरते.
द्विमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षाचा संचालक ग्रह चंद्र आहे. तो इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवण्यात वा कुंडलिनी जागृत करण्यात मदत करतो.
हा धारण केल्याने स्त्री रोग, रक्तविकार, अनिद्रा, मेंदूविकार, डाव्या डोळ्याचे दोष, रक्ताल्पता , जलविकार, मूत्रपिंड विकार, स्मृतिभ्रंश इत्यादी विकार दूर होतात. गुणांच्या तुलनेत हा रुद्राक्ष मोत्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त गुणकारी असतो.
तीनमुखी रुद्राक्ष– यात ब्रह्मा,विष्णू व महेश या तिन्ही शक्तींचा संगम असतो. याचा प्रधान ग्रह मंगल आहे. हा धारण केल्याने आत्मविश्वास, निर्भयता, द्वेष, उच्चज्ञान, वायुदोष यात लाभ होतो.
पटकी, प्लेग , देवी, रक्तदाब, रक्ताल्पता, स्त्रीविकार , अस्थिभ्रंश, मुळव्याध, अल्सर, अतिसार, जखमा यावरील उपचारात लाभ होतो. वृश्चिक व मेष राशीच्या लोकांसाठी त्रिमुखी रुद्राक्ष अत्यंत भाग्योदयकारी ठरते.
चतुर्मुखी रुद्राक्ष – चार मुखे असणारा रुद्राक्ष हा साक्षात ब्रम्हदेवाचे स्वरूप मानला जातो. हा मनाची एकाग्रता वाढवितो. लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व व्यापारी वर्गासाठी हा लाभदायी आहे.
याच्या प्रभावाने चपळपणा, चातुर्य व ग्रहणशक्तीमध्ये लाभ होतो. या रुद्राक्षावर बुध ग्रहाचे नियंत्रण असते. हा धारण केल्याने अपस्मार, नाक, कान तसेच गळ्याचे विकार, नपुसंकता, तोतरेपणा, पांढरे डाग,
मनोविकार, त्वचा विकार, कोड, अर्धांगवायू, पीतज्वर, नासिका विकार, दमा इत्यादी आजार दूर होतात. व्यापारी तसेच मिथुन व कन्या राशीच्या जातकासाठी हा रुद्राक्ष धारण करणे लाभप्रद ठरते.
पाचू ऐवजी चुतुर्मुखि रुद्राक्ष धारण केल्याने पाच पेक्षा अनेक पटींनी लाभ होतात .
पंचमुखी रुद्राक्ष – पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याने यश व धनाची प्राप्ती होते. याचा संचालक ग्रह गुरु आहे. मानसिक शांती, वाईट सवयींपासून सुटका, मंत्रसिद्धी, पवित्र विचार व जास्त कामेच्छावर नियंत्रण
ठेवण्यासाठी हा सहाय्यकारी ठरतो. हा धारण केल्याने लठ्ठपणा, मूत्रपिंड, ,मधुमेह व कर्णविकार बरे होतात. स्थूलता, उदरविकार, गाठ, जास्त मद्यपान करणे, अनिमिया, कावीळ, चक्कर येणे, स्नायुदुखी
यावरील उपचारात हा रुद्राक्ष गुणकारी ठरतो. धनु व मीन राशींच्या व्यक्तींनी तसेच व्यापारयांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे लाभदायी ठरते. हा पुष्कराज रत्नापेक्षा जास्त गुणकारी आहे.
षष्टमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष साक्षात शिवपुत्र कार्तिकेय व गणेशाचे स्वरूप आहे. या रुद्राक्षाचा नियंत्रक व संचालक ग्रह शुक्र आहे. हा ग्रह भोग, विलास व सुखसुविधांचा प्रतिनिधी आहे.
हा धारण केल्याने प्रेम, कामसुख, संगीत, कविता, सृजनात्मक व कलात्मक कौशल्य , समजूतदारपणा, ज्ञान व वाकचातुर्य यात लाभ होतो.
महारोग नपुंसकता , मंद कामेच्छा, मुतखडा व किडनी विकार, मूत्रविकार , शुक्राणू अल्पता व गरोदरपणातील विकार यावरील उपचारात सहामुखी रुद्राक्ष धारणा इष्ट ठरते. वृषभ व तूळ राशीच्या जातकांसाठी हा विशेष लाभकारी आहे.
सप्तमुखी रुद्राक्ष-सप्त मातृका व हनुमान या रुद्राक्षाच्या देवता आहेत. हा संपत्ती कीर्ती व विजयश्री प्रदान करणारा आहे. हा धारण केल्याने शरीरावर कोणत्याही विषाचा प्रभाव पडत नाही. कालसर्पयोगातही अनुकुलता प्राप्त होते.
मनुष्य स्त्रियांना प्रिय बनतो. यांच्या वापराने आरोग्य, सौभाग्य, संपत्ती प्राप्त होऊन रेंगाळलेली कामे मार्गी लागतात निराशा दूर होते. खासकरून शनि पीडा व शनीच्या साडेसातीच्या अनिष्ट प्रभाव दूर करण्यासाठी हा रुद्राक्ष लाभदायी आहे.
अष्टमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षामध्ये कार्तिकेय, गणेश अष्ट मातृकागण, अष्टवसुक गण व गंगा यांचा वास मानला जातो. याच्या वापराने शत्रूवर व संकटावर विजय प्राप्त होतो. याचा संचालक ग्रह राहू आहे.
राहू हा आकस्मिक घटना घडविणारा ग्रह आहे. अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्याने त्वचाविकार फुप्फुसांचे विकार, पाण्यातील बिघाड, गुप्तरोग, मानसिक अशांती, सर्पदंश व तांत्रिक विद्यांमुळे होणारे अनिष्ट प्रभाव तसेच मोतीबिंदू यात लाभ होतो
नऊमुखी रुद्राक्ष – हा साक्षात भैरव स्वरूप आहे. हा धारण केल्याने यश, सन्मान, संपत्ती, सुरक्षा, चतुराई, निर्भयता, शक्ती, कार्य नैपुण्य, वास्तुदोष याबाबतीत लाभ होतो. नऊमुखी रुद्राक्षाचा संचालक ग्रह केतू आहे.
केतू अनिष्ट असेल तर फुप्फुसबाधा, ज्वर, नेत्रविकार, बहिरेपणा, अनिद्रा , संतानप्राप्ती दोष, उदर विकार, शरीरदुखी अपघात तसेच अज्ञात कारणांमुळे उत्पन्न होणारे रोग उदभवतात.
केतू ग्रहाच्या शांतीसाठी लसण्या रत्न वापरले जाते; परंतु नऊमुखी रुद्राक्ष हा लसण्या रत्नापेक्षाही कितीतरी जास्त पटींनी प्रभावी आहे.
दशमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षामध्ये यम्देव्त, विष्णू महासेन, दशारिक पाल व दश महाविद्यांचा वास असतो. याची इष्ट देवता विष्णू आहे. यामुळे कफ, फुप्फुसाचे विकार, चिंता, अशक्तपणा, हृदयविकार यात लाभ होतो
एकादश मुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षावर इंद्र देवतेचे स्वामित्त्व आहे. हा धारण करण्याने सर्व इंद्रिये व मन नियंत्रित होते. कुंडलिनी जागृती, योगसंबधीची एकाग्रता, रोगोपचार, निर्भयता, निर्णय क्षमता या बाबीत लाभ होतो.
हा शारीरिक आरोग्य, यम-नियम, योगासने, षटकर्म वा इतर यौगिक क्रियांमध्ये येणार्या बाधा नष्ट करतो. याच्या वापरणे स्त्री विकार, जुने चिवट रोग, शुक्राणु अल्पता व संतान प्राप्तीतील बाधा यात लाभ होतो.
द्वादशमुखी रुद्राक्ष – हा साक्षात सुर्यस्वरुप आहे. हा धारण करणारी व्यक्ती निरोगी व अर्थप्राप्ती करून सुखी जीवन व्यतीत करते. त्याच्यात नेतृत्व गुण, आत्मसन्मान , आत्मविश्वास , प्रेरणा, श्रद्धा, आरोग्य व शक्ती हे गुण येतात.
गुणामध्ये हा रुद्राक्ष माणिक रत्नाहून जास्त प्रभावी तसेच किमतीने कमी आहे. याचा वापर केल्याने डोकेदुखी, टक्कल पडणे, ज्वर, डोळ्यांचे विकार, हृदयविकार, वेदना तसेच मूत्राशय व पित्ताशयाचि जळजळ या विकारात लाभ होतो.
त्रयोदशीमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष साक्षात कामदेवस्वरूप आहे. हा धारण केल्याने सर्व ऐशोराम, सौंदर्य, प्रसिद्धी, वशीकरण व लक्ष्मीप्राप्ती होते. हा दाम्पत्य जीवनात सर्व सुखे देण्यास सक्षम आहे.
याच्या वापरामुळे किडनी, नपुसंकता, मूत्राशय विकार, कुष्टरोग, गरोदरपणातील रोग, शुक्राणु अल्पता या विकारात लाभ होतो.
चतुर्दशमुखी रुद्राक्ष – हा साक्षात कंठ स्वरूप आहे. हा सर्व रोगांचे हरण करणारा तसेच आरोग्य प्रदान करणारा आहे. हा धारण केल्याने वंशवृद्धी होते. यात हनुमानाचाही वास आहे असे मानले जाते.
हा भूतपिशाच्च , डाकिनी, शकिनी यापासून रक्षण करतो. याचा वापर केल्याने निराशा मानसिक विकार, बहिरेपणा, कॅन्सर, चित्तभ्रम, थकवा व पायांचे विकार बरे होतात.
गौरीशंकर रुद्राक्ष – मुख असणार्या रुद्राक्षामध्ये गौरीशंकर रुद्राक्ष सर्वश्रेष्ट आहे. याचा वापर केल्याने पारिवारिक ऐक्य, आत्मिक ज्ञान, मन व इंद्रियावर नियंत्रण, कुंडलिनी जागृती तसेच पतीपत्नीमधील समरसता वाढते.
मानसिक व शारीरिक विकारांनी पिडीत लोकांसाठी हा रुद्राक्ष दिव्य औषधी सिद्ध होतो.
गणेश रुद्राक्ष – संतती प्राप्ती बाधा तसेच वैवाहिक समस्या व विवाहासाठी विलंब यावर उपाय म्हणून हा रुद्राक्ष धारण करणे लाभदायी ठरते. याचा वापर केल्याने विद्या, ज्ञानप्राप्ती, मानसिक असंतोष तसेच सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
त्वचाविकार, उचकी, गुप्तरोग, मानसिक अशांती , सर्पदंश, कॅन्सर व तांत्रिक विद्येमुळे होणारे दुष्परिणाम यावर हा उत्तम लभक्रि आहे.
पथरी रुद्राक्ष – यात व्हिटमिन्स व विद्युत तरंग लहरींचे प्रमाण जास्त असते. नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत कठीण असल्याने याचे आयुष्य अनेक शतकांचे असते. उच्च परिणामासाठी हा रुद्राक्ष धारण करणे इष्ट ठरते.