खरबूज आहे पौष्टिक आणि गारवा देणारे

आरोग्य ज्ञान

उन्हाळ्यामध्ये आंबा, फणस , कलिंगड अशी अनेक प्रकारची फळे येतात. खरबूज हेदेखील उन्हाळ्यात येणारे एक फळ .
स्वादिष्ट गोड आणि पौष्टिक असणारया खरबूजाची आपलिया काही खास वैशिष्ट्ये आहेत.

खरबूज आहे पौष्टिक आणि गारवा देणारे
खरबूज आहे पौष्टिक आणि गारवा देणारे
  • खरबूज हे मूळचे आफ्रिकेतील फळ असल्याचे मानले जाते. मात्र आता ते उष्ण, कोरडे हवामान असलेल्या सर्वच ठिकाणी तयार होते. भारतात खरबुजाच्या अनेक जाती तयार होतात. लखनऊ सफेदा आणि चित्ता, पंजाबमध्ये चुनियारी आणि क्लांची तर दक्षिण भारतात बताशा, शरबत , शिरंजित , हिंगम आणि बुंदूभी या जाती तयार होतात .
  • पिकलेले खरबूज पौष्टिक असते. त्याच्या सेवनाने शरीरातील जड उष्णता बाहेर फेकली जाते आणि शरीराला गारवा दिला जातो. कच्चे खरबूज हिरवे असते मात्र पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग पिवळा होतो. तयार खरबूजात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, खनिज, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, थियामीन , रिबोफ्लेवीन, नायसिन ,विटामिन ए आणि विटामिन सी असते. खर्बुजात अनेक औषधी गुण आहेत. ते इतर फळांच्या तुलनेत यात क्षारीय गुण अधिक असतात. ते पचनक्रियेत मदत करते. अजीर्ण झालेल्यांसाठी खरबूज खाणे लाभदायक आहे. मलावरोध, मुळव्याध यावरही खरबूज गुणकारी आहे.
  • खरबुजाच्या बिया उपयुक्त असतात. त्यांच्यापासून तेल  काढले जाते अत्यंत पोषक हे तेल खाण्यासाठी वापरले जाते. बियांपासून तयार होणारा बीजपाठ शीतल आणि  मेंदू तल्लख करणारा असतो.

 

Leave a Reply