आरोग्यदायी उसाचा रस

आरोग्य ज्ञान

उसाचा रस हे नैसर्गिक पेय असून आपल्या आरोग्यालाही तो फायदेशीर आहे. अनेक रोगांवरही उसाचा रस गुणकारी आहे.
उन्हाळ्यात थंडावा देण्याचं कामही उसाचा रस करतो. अशा या बहुगुणी उसाच्या रसाविषयी जाणून  घेऊयात .

आरोग्यदायी उसाचा रस
आरोग्यदायी उसाचा रस
 • उसाचा रस चवीला गोड असतो. तो मुत्रल, रेचक , शीत तसेच उत्साहवर्धक असतो, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो .
 • खोकला, दमा, पंडुरोग, त्वचेच्या विकारांवर हा रस गुणकारी ठरू शकतो.
 • उसाच्या रसामध्ये साखर हि नैसर्गिक रुपामध्ये असते. त्यातील साखर व रोजच्या वापरातील साखर यात फरक आहे. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका संभवत नाही.
 • उसाचा रस हा कवील या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेह्र्मी पिणे फायदेशीर आहे.
 • कावीळ झाली असल्यास उसाचा रस आणि रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत मिळते.

        ( काविळीच्या रुग्णांनी आले, लिंबू आणि बर्फ न घालता फक्त उसाचा रस पिल्यास कावीळ ५० टक्के वेगाने बरी होते.)

 • मूत्ररोग आणि कीडनीशी सबंधित रोगावरदेखील उसाचा रस फायदेशीर आहे.
 • उसाचा रस हा थकवा घालवून उत्साह वाढवणारा असल्यामुळे खेळाडू, अथलटिक   यांना फायदेशीर आहे.
 • कृत्रिम थंड पेये शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
 • उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहानांपासून ये वृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात
 • १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणातच घ्यावा.
 • उसाचा रस हा नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

 

Leave a Reply