संसारात चकमकी घडवणारी ४ कारणं

रिलेशनशिप

पैसा सेक्स वेळ संवाद

या ४ विषयांवर कायम वादविवाद होतात पती-पत्नी आणि प्रेम यांची जशी अभिन्न जोशी आहे, तशीच पती-पत्नी व भांडणं यांची युतीही ठरलेली आहे. एकमेकांवर अतिशय प्रेम असलेल्या जोडप्यांमध्येदेखील भांडणं न चुकता होतात. मानसशास्त्रज्ञांनी  अशा भांडणांचा अभ्यास करून त्यामागची चार मुलभूत कारणं सांगितलेली आहेत.  त्याचबरोबर हि भांडणं टाळण्याचे उपायही सांगितले आहेत. हि त्यांची ओळख
संवादाचा अभाव
अपुरा किंवा अयोग्य संवाद संसारामध्ये कलहाची वादळ निर्माण करतो. पती- पत्नीपैकी एक जन जेव्हा दुसऱ्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत नाही किंवा नाराजीमुळे ऐकून घेण्याचंच नाकारतो अथवा चुकीचं ऐकतो तेव्हा पती-पत्नीमधला संवादाचा अभाव उघड होतो. जोडीदाराच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ अथवा अनर्थ करण्यामुळेही चकमकीची ठिणगी पडते.
इलाज :
पती-पत्नीची एकमेकांशी बोलण्यासाठी दिवसातून १५ मिनिट राखून ठेवावी. असा कौटुंबिक जीवनविषयक सल्लागारांचा त्यांना कळकळीचा सल्ला आहे, ज्या वेळी पती मोबाईल अथवा लॅपटॉपवर बिझी नसतो; पत्नी टीव्ही सिरियलमध्ये किंवा स्वयंपाकात गुंतलेली नसते  किंवा मुलांचा अभ्यास घेण्यात अथवा अन्य घरकामात व्यस्त नसते, अशी हि १५ मिनिट असावीत.

या वेळी दोघांनी इतर सर्व कामं आणि व्यवधान बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी बोलावं आणि मुख्य म्हणजे जोडीदाराच बोलणं शांतपणे व लक्षपूर्वक ऐकावं अन त्यानंतरच प्रतिक्रिया व्यक्त करावी.मतभेद जरूर बोलावेत, पण जोडीदार बोलत असताना त्याला मध्ये मध्ये अडवू  नये. संसारातही लोकशाही हवीच !
बोलण्याच आणि विचारांचं स्वातंत्र्य हवंच. मात्र तुला समजत नाही…. तुझं असंच उफराट वागणं  असतं…. तू लक्ष देत नाहीस…. तुला काळजीत नाही ‘ यासारखी स्वभावदोषांवर   बोट ठेवणारी  लागट वाक्य दोघांपैकी कुणीही बोलू नयेत. त्याचप्रमाणे चढ्या आवाजात बोलणं टाळाव. लक्षात ठेवा. तुम्ही निवडणुकीतले प्रतिस्पर्धी उमेदवार नाहीत. एकमेकांवर प्रेम करणारे पती-पत्नी आहात. आरोपांची फैर एकमेकांवर झाडू नका.

संसारात चकमकी घडवणारी ४ कारणं
संसारात चकमकी घडवणारी ४ कारणं

पैसा, दृष्टीकोन, हाताळणी व नियंत्रण
इतर सर्व वादविवादाप्रमाणे  संसारातही पैसा हे लढाईच कारण ठरतं. पैशाबाबत दोघांच्या दृष्टीकोन, पैसे कोण व कसे हाताळतो आणि पैशाबाबत- खर्चाबाबत अधिकार कुणाचा, नियंत्रण कुणाचं हि संघर्षाची कारणं ठरतात.  पती मिळवती असेल तर दोघांनी घरखर्चाचा अंदाज घेऊन ‘ फिफ्टी-फिफ्टी’ वाटणी करावी.  खर्चाबाबतचा प्रत्येक निर्णय दोघांनी मिळून घ्यावा पुरुषांना पगार कमी सांगण्याची आणि आपल्या मौजमजेसाठी काही पैसा परस्पर खर्च करण्याची वाईट सवय असते.

 ती पूर्णपणे बंद व्हायला हवी. पत्नीनंही शॉपिंगवर मर्यादा ठेवायला हवी मिळवत्या पती-पत्नींनी आपापले पगार व आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक यांच्याबाबतीत  पारदर्शीपणा ठेवावा. ऐन वेळच्या खर्चाच्या बाबींसाठी शिल्लक हाताशी राहील अशी खबरदारी घ्यावी. जॉइन्ट  अकाउंटवरचे व्यवहार कायम परस्परांना विचारून करावे.
पत्नी मिळवती नसली तरी पतीनं  घरखर्चाबाबत तिला पुरेशी रक्कम आणि स्वातंत्र्य द्यावं. तिच्याशी चर्चा करूनच आर्थिक निर्णय घ्यावेत. आपल्या आर्थिक व्यवहारांची तिला वेळच्या वेळी माहिती द्यावी.

सेक्स – वैवाहिक जीवनात सेक्स म्हणजे सर्वस्व नसलं तरी सहवास सुखाचा व दु:खाचा ठरण्याच ते एक प्रमुख कारण आहे. सेक्सची सतत अपेक्षा व अतिरेक  चिडचिड व राग निर्माण करतो.  मुलाच्या जन्मापूर्वी सेक्सबाबतचा जो आवेग असतो, तो त्याच्या जन्मानंतर कायम राहणं कठीण असते.  पुरुषाची सेक्सबद्दलची  भूक साठीनंतरही कायम राहाते, तर अपत्यजन्मानंतर  स्त्रीची  कामेच्छा कमी अथवा अनियमित होते. इथूनच काबुरी सुरु होतात .

इलाज

बालसंगोपनाच  कामं अत्यंत खडतर, वेळखाऊ, क्लिष्ट तसंच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची खंडणी वसूल करणारं असतं
बाळाकरता रात्रीअपरात्री उठणाऱ्या पत्नीपाशी सेक्सकरता  उत्साह व जोम असेल, अशी पुरुषान अपेक्षा करणं हा अमानुषपणा आहे. तिचा आपल्यातला इंटरेस्ट संपला आहे, असं मानणं हा दृष्टपणा व संकुचितपणा आहे. पत्नीचा लवकरात लवकर सहवास हवा असेल , तर पतीनं बालसंगोपनात  बरोबरिन जबाबदारी  उचलली पाहिजे.

मुलांचं वय जसजसं वाढत जाईल, तसतसं ‘ सेक्स ‘  बद्दल अधिक सावध व संयम धोरण ठेवावं लागेल. याचा अर्थ मुलाबाळांच्या प्रवेशानंतर पती-पत्नीमधला शृंगार संपतो, असं होत नाही. त्याकरता महिन्यातले ठराविक दिवस राखून ठेवायला हवेत. अधूनमधून छोटे-मोठे प्रवास करायला हवेत त्यामुळे संसाराच्या रामरगाड्यातून स्त्रीला सुटका मिळते. तसं झालं तरच तिचा उत्साह कायम राहील. अचानक व उत्स्फूर्त सेक्सची संधी मिळेल, तेव्हा ती अवश्य साधावी . मात्र फक्त सेक्ससाठी सार काही, असं दृष्टीकोन पुरुषान ठेवू नये.

वेळ : संसाराच वय जसं वाढत जातं तसा पती-पत्नीना एकमेकांसाठी वेळ देणं कठीण होत जातं. वाढत्या वयाची मुलं घरात असतील तर बघायलाच नको.
मात्र कधी ना कधी दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची उणीव जाणवू लागते. दुर्दैवानं जोडीदार आपल्याला पुरेसा वेळ देत नाही, अशी दोघांचीही तक्रार असते.
इलाज :
वैवाहिक सल्लागार म्हणतात, १०० पैकी ९९ जोडप्यांची एकमेकांबद्दल हि तक्रार असते! जेवण, शॉपिंग , छोट्या-मोठ्या सहलींना बरोबर जाणं म्हणजे एकमेकांना वेळ देणं नव्हे.  एकमेकांच्या बौद्धिक , भावनिक स्वास्थ्यासाठी सहवास आवश्यक असतो. तुम्ही एकमेकांसाठी दोन तास देणं महत्त्वाचं नाही, त्या दोन तासांत तुम्हाला आनंद मिळतो का ? हे महत्त्वाचं आहे.

तो मिळत असेल, तर अर्धा तसाही पुरेसा आहे पण वेळेबाबतच्या आकड्यांना महत्त्व नाही. सेक्सखेरीज ज्या गोष्ठीबरोबर करण्यात आनंद वाटतो, अशा एखाद्या तरी कामाला रोज वेळ द्या. मग ते कामं भाजी आणण्याचं असलं तरी हरकत नाही. महत्त्व त्या कामाला नाही. पती- पत्नीनी एकमेकांच्या सान्निध्यात राहण्याला आहे.

Leave a Reply