डोळ्यांची स्वच्छता आणि रक्षण

आरोग्य ज्ञान
  • डोळे हे आपल्या शरीराचे अत्यंत मूल्यवान अवयव आहेत. त्यांच्यावाचून जीवन शुन्य व व्यर्थ आहे म्हणून डोळ्यांची स्वच्छता व रक्षणावर विशेष लक्ष दिले पाहिजे.
डोळ्यांची स्वच्छता आणि रक्षण
डोळ्यांची स्वच्छता आणि रक्षण
  • रात्री झोपले असता डोळ्यातील मळ चिपडाच्या स्वरुपात बाहेर येऊन पापण्याच्या टोकावर केसात एकत्रित होतो. तो साफ करण्यासाठी नित्य सकाळी डोळे स्वच्छ व थंड पाण्याने धुणे हि सर्वात उत्तम पद्धती आहे.
  • दात घासताना, जेवण्यापूर्वी किंवा नंतर जेव्हा आपण तोंड धुतो त्यावेळी त्याबरोबर डोळेही धुवावेत.
  • डोळ्यावर थंड पाणी मारणे व स्नानानंतर स्वच्छ व थंड ओला कपडा  डोळ्यावरून काही वेळ फिरविणे हितकारक असते.
  • डोळ्यांच्या रक्षणासाठी भोजनात भरपूर पौष्टिक पदार्थ, विशेषत : तूप खावे. पौष्टिक पदार्थाच्या अभावामुळे डोळ्याची दृष्टी कमी होते.
  • मस्तकाला थंड ठेवणारे तेल चोळणे, नेहमी  प्रांत:काळी नाकाने पाणी पिणे, ठरलेल्या वेळी रात्री झोपणे आणि पूर्ण झोप झाल्यावर प्रांत:काळी उठणे हे डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयोगी उपक्रम आहेत.                                                   

 

Leave a Reply