वेदनाशामक औषधी जायफळ

आरोग्य ज्ञान
  • देशी औषधांमध्ये जायफळ अत्यंत  प्रसिद्ध आहे. याच्या सालींना नावित्री म्हणतात. जायफळाचे तेल अत्यंत उत्तेजक असते.
  • सर्दी-पडशाने होणारया डोके दुखीमध्ये दुधामध्ये जायफळ उगाळून माथ्यावर लेप लावल्याने आराम मिळतो.
वेदनाशामक औषधी जायफळ
वेदनाशामक औषधी जायफळ
  • जायफळाचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ घेण्याने पोटदुखीमध्ये लाभ होतो. जायफळ देशी तुपामध्ये मिसळून पापण्यांवर लेप करण्याने अनिद्रा रोग दूर होतो.
  • जायफळ उगाळून अर्धा चमचा लेप एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून त्याने गुळण्या करण्याने तोंडातील चाक्ते दूर होतात आणि बसलेला घसा मोकळा होतो.
  • एक ग्रॅम जायफळाचे चूर्ण, मधामध्ये मिसळून सकाळ- संध्याकाळ चाटविण्याने पाचनशक्ती तीव्र  होते. तुळशीच्या पानांबरोबर जायफळाचे तुकडे चावण्याने उचकी शीघ्र बंद होते.
  • एक ग्लास दुधामध्ये अर्धा ग्रॅम जायफळाचे चूर्ण मिसळून पिण्याने सर्दी- पडसे तसेच सर्दीने होणारे आजार दूर होतात.
  • सर्व प्रकारच्या वेदनामध्ये  जायफळ सरसोच्या तेलात मिसळून  मालिश करण्याने वेदनामध्ये आराम मिळतो .

 

Leave a Reply