नारळ – स्वास्थ्य व सौंदर्याचा रक्षक

आरोग्य ज्ञान
 • नारळ हे सहजपणे पचणारे फळ आहे. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. सुक्या खोबरयात सुमारे ६६२ कॅलरी प्रती १०० गरम इतक्या अधिक प्रमाणात ऊर्जा असते. आतड्यातील जंतासाठी नारळ हे जुने व प्रभावशाली औषध आहे
 • नारळ हे एक पवित्र मानले गेलेले फळ, म्हणूनच याला ‘ श्रीफळ ‘ असे म्हणतात. भगवान विष्णूंनी हे फळ पृथ्वीवर आणले अशी कथा आहे.
नारळ - स्वास्थ्य व सौंदर्याचा रक्षक
नारळ – स्वास्थ्य व सौंदर्याचा रक्षक
 • नारळात अनेक औषधी गुण आहेत. कोवळा नारळ, म्हणजे शहाळे हे सर्वोत्तम गुणयुक्त भोजन मानले जाते. त्यात अनेक पाचक रस असतात.
 • ताज्या नारळात ३६.३% आद्रता ४.५% प्रोटीन, १.००% खनिज , ३.६ % तंतुमय पदार्थ , तसेच १३% कार्बोहायड्रेट असतात.
 • प्रती किलोग्रॅम यात १० मि.ग्रॅम कॅल्शीयम ,२४० मि. ग्रॅम फॉस्परस, १.७ मि. ग्रॅम थायमाईन रीबोफ्लेवीन. ०.९० मि.ग्रॅम नियासिन आणि १.० मि.ग्रॅम क जीवनसत्व असते.
 • आतड्यातील जंतासाठी नारळ हे जून व प्रभावशाली औषध आहे. चमचाभर वाटलेले खोबरे नाश्त्याच्या वेळी खायचे व तीन तासांनी एरंडेल  तेलाचा एक डोस घ्यायचा.
 • सुके खोबरे हे असिडीटीवर  उपयुक्त आहे. त्यातील तेलाने पोटातील असिडस्त्राव कमी होतो आणि रुग्णाला आराम वाटतो.
 • मूत्र विकारात नारळाचे पाणी मूत्र निर्मिती करणाऱ्या औषधाचे काम करते. त्यामुळे यकृत व मुत्रपिंडातील विषमता, लघवीची जळजळ आणि इतर त्रास दूर होतात.
 • पित्तासंबंधित टपावर नारळपाणी लाभदायक आहे, ते थोड्या थोड्या प्रमाणात काही वेळाने देत राहावे. जर तहान लागली, तर नारळपाणी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, काही वेळाने प्यावे.
 • भाजल्यावर वा चटका बसल्यावर नारळाचे तेल लावल्याने त्वरित बरे वाटते. तयार नारळाचे खोबरे जाळून जे तेल निघते, ते मलमाप्रमाणे  लाभदायक असते. इतर त्वचारोगांवर ते परिणामकारक असते.
 • विविध उत्पादनांमध्ये नारळाचा वापर केला जातो. दक्षिण भारतात खोबरेल तेलाचा  वापर स्वयंपाकासाठी  केला जातो. ओल्या आणि सुक्या खोबारयापासून मिठाया व इतर खाद्यपदार्थ बनविले जातात.

 

Leave a Reply