अरुची , अजीर्ण, अतिसारावर उपयुक्त : डाळिंब
अरुची :
डाळींबाच्या दाण्यांच्या रसात २-३ ग्रॅम सैंधव आणि १- २ चमचे मध मिसळून घ्यावा .
अनारदाना १०० ग्रॅम ,काळी मिरी , जिरे , सैंधव प्रत्येकी १५-१५ ग्रॅम आणि १२० ग्रॅम खडीसाखर एकत्र करून त्याचे चूर्ण करावे व ३-४ ग्रॅम सेवन करावे.
१ किलो डाळिंबाचे दाने, तुपात भाजलेला ३ ग्रॅम हिंग, २५० मी. ग्रॅम सैंधव, मिरी २५० ग्रॅम, पांढरे जिरे २५० ग्रॅम. मोठ्या वेलदोड्याचे बी ६० ग्रॅम खडीसाखर २५० ग्रॅम घेऊन हिंग सोडून बाकी सर्वांचे बारीक चूर्ण करावे.
नंतर हिंग बारीक करून त्यामध्ये मिसळावा. हे चूर्ण भूक वाढवते. ताप. खोकला, जुलाब यावरही उपयुक्त आहे. कुटुंबातील सर्वांसाठी आरोग्यदायी हे चूर्ण ४-५ ग्रॅम सेवन करावे.
डाळिंबाचे दाने, लिंबू, आले आणि पुदिन्याचा रस समप्रमाणात घेऊन त्याच्या चौपट साखर मिसळून पाक तयार करावा. त्यात गरजेनुसार भाजलेले जिरे, वेलदोडे बी, मिरपूड मिसळावी , हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा २५-२५ ग्रॅम चाटून खावे.
अजीर्ण :
डाळिंबाचा रस ४०-५० मी. लि . भाजून वात्लेलेल जिरे १० ग्रॅम, गूळ१० ग्रॅम एकत्र करून दिवसातून ४-५ वेळा १०-१२ ग्रॅम सेवन करावे. याने मंदाग्नी, अजीर्ण, अरुची आदि अपचनामुळे होणारे विकार बरे होतात.
अनारदाना, काळे मीठ, जिरे १-१ ग्रॅम खून वर गरम पाणी प्यावे.
अतिसार :
डाळिंबाच्या रसात उसाचा रस मिसळून प्यायला असता रक्ती जुलाबही बंद होतात.
अनारदाना, बडीशेप व धने समप्रमाणात घेऊन तेवढीच खडीसाखर घेऊन चूर्ण करून ठेवावे. यातील ४-५ ग्रॅम चूर्ण दिवसातून ३-४ वेळा सेवन केल्यास सर्व प्रकारचा अतिसार ( जुलाब) बंद होतो.