ऑफिसमध्ये वर्तन कसे असावे ?
आपण घरापेक्षाही जास्त वेळ ऑफिसमध्येच असतो. त्यामुळे ऑफिसमधील आपले वर्तन अनुकरणीय असायला हवे. यामुळे आपल्याला समाजात प्रतिष्टा देखील मिळते. म्हणूनच जाणून घेऊया ऑफिसमधील आपले वर्तन कसे असावे याविषयी
- ऑफिसमध्ये नेहमी वेळेवर पोहचण्याची सवय स्वत:ला लावून घ्या. उशिरा जाने आणि लवकर निघणे यामुळे केवळ समस्याच वाढतात असं नव्हे तर त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेवरही प्रतिकूल परिणाम होतो.
- ऑफिसमध्ये आपला पेहराव, बोलण, हसण, गप्पा मारण यावर नियंत्रण असावं गरजेपेक्षा अधिक बोलण , शोबाजी करणं यामुळे तुम्ही सदैव चर्चेत रहाल.
- ऑफिसमध्ये स्वत:च्या जागेवरच बसा. आपली जागा सोडून इतरांच्या जागेवर बसने, उगाच गप्पा मारणे यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि अधिकाऱ्यांनाही असे कर्मचारी आवडत नाहीत.
- तुमच्या आर्थिक आणि सामाजिक क्षमतेनुसारच तुमचे वर्तन असावे. कोणाकडूनही शक्यतो कर्ज घेऊ नका.
- बॉसच्या खासगी गोष्टीमध्ये मुळीच लक्ष देऊ नका. करणं अशा आवडीमुळे तुमची अडचणीत येण्याची संबंधही खराब होण्याची शक्यता असते.
- तुमच्या पात्रतेनुसार राहा. इतरांच अनुकरण करू नका. मनात कोणाविषयीही हिनतेची भावना नसावी.
- तुमच्यात असणारया कमतरतांबद्दल स्वत:ला दोषी मानू नका.उलट त्या कमतरता कशा कमी करता येतील याचा विचार करा आणि त्याप्रमाणे कृती करा.
- ऑफिसमध्ये दुसरे लोक काय करत, हे बघण्यात स्वत:चा वेळ वाया घालविण्यापेक्षा स्वत:ला कसं शिकता येईल याचा विचार करा.
- स्वत:चं काम स्वत: करा आजचं काम आजचं पूर्ण करा. कामापासून दूर पळण्यापेक्षा सतत नवीन शिकण्याची, मानसिकता बाळगा.