उदरविकार बरे करणारे जिरे
मसाल्याच्या पदार्थांपैकी एक ‘ जिरे’ हे सर्वांच्या परिचयाचे आहे. या जिरयाचा उपयोग अपचन , पोट दुखणे, भूख न लागणे अशा विकारांसाठी रामबन औषध म्हणून करण्याची एक अत्यंत सोपी व परिणामकारक पद्धत आपण पाहू.

- हे औषध घरीच करता येणे सहजपणे शक्य आहे. यासाठी लागणारे पदार्थ : सफेद जिरे -५० ग्रॅम, शुद्ध सिरका-५०० मिलि.अमलासार गंधक -१० ग्रॅम काळे मीठ-५० ग्रॅम
- वरील दिलेल्या प्रमाणात सर्व पदार्थ एका काचेच्या, चिनीमातीच्या किंवा स्टीलच्या रुंद तोंडाच्या भांड्यात एकत्र करून टाका. हे मिश्रण तीन-चार दिवस तसेच ठेवा. त्यानंतर ते बाहेर काढा आणि त्यातील जिरे सावलीत चांगले सुकवा.
- हे सावलीत सुकाविलेले जिरे दररोज दिवसातून २ ते ३ वेळा दरवेळी सुमारे ५०० मि. ग्रॅम या प्रमाणत तोंडून टाकावे आणि शांतपणे चोखून-चोखून खावे.
- याच्या सेवनाने पोटाचे विकार बरे होतात. त्याचप्रमाणे जर प्लीहा आकार वाढून मोठी झाली असली, तर ती पुन्हा ‘ नॉर्मल ‘ होते .