लोभ हे सर्व दु:खाचं, त्रासाच मूळ लोभ फक्त पैशाचा नसतो, प्रसिद्धीचा व माणसांचाही असतो

लाइफस्टाइल

“लोभ हे सर्व दु:खाचं, त्रासाच मूळ लोभ फक्त पैशाचा नसतो, प्रसिद्धीचा व माणसांचाही असतो”
अजुनी चालतोची माळ, वाट हि सरेना! असं वाटत तेव्हा तो प्रवास सुखाचा नसतो हे उघड आहे. नियतीनं डोक्यावर लादलेली दु:खाची ओझी वेगळी;
पण माणूस बरीच दु:ख आणी निराशा स्वत:च ओढवून घेत असतो; पण या गोष्टींना तो बरयाचदा स्वत:च जबाबरदार असतो खरा. असं का होत? अपयश, दु:ख, निराशा कुणालाच नको असतात. या गोष्टी माणसाच्या वाट्याला येतात. कारण त्याचा लोभ. त्याला कशाचा लोभ नसतो विचार! कुणाला पैशाचा, कुणाला प्रसिद्धीचा, कुणाला सत्तेचा, कुणाला यशाचा, आणखी कुणाला चंगळबाजीचा, तर कुणाला सुंदर स्त्रीचा. इतकेच नाही,तर काहींना माणसांच्या सहवासाचाच लोभ असतो. लोभ जोवर निकोप असतो, मर्यादित असतो तेव्हा तो लोभसवाणा असतो. मर्यादा ओलांडली गेली कि याच विशेषणांच दूषण होतं. लोभ मर्यादित असतो तेव्हा एखाद्याचं रूप किंवा हसू लोभसवाण असतं .स्वभाव लोभसवाणा असतो. या गोष्टींची ओढ लागते. आकर्षण वाटतं. एखादी गोष्ट हवीशी वाटणं यात काहीच गैर नाही; पण ती मिळण्यासारखी नाही हे लक्षात आल्यावरही तिच्यामागे धावणं आणि काय वाटेल ते करून ती मिळवण्याची धडपड करणं वाईट आहे. पैसा, प्रसिद्धी, यश, सत्ता, सौंदर्याचीसोबत, आरामाची राहणी या गोष्टीची इच्छा असणं स्वाभाविक आहे. यश तर माणसाला पहिल्यापसून हवं असतं. नाहीतर शाळेत असताना पहिला नंबर मिळवण्यासाठी माणूस झटला नसता. पहिल्या नंबरकरता प्रत्येकानं प्रयत्न करावा; पण लक्षात घ्यायला हवं कि, प्रत्येकाचा नंबर पहिला येण अशक्य आहे. मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना हे समजण आवश्यक आहे. मुलांच्या मनात पहिल्या नंबरच्या आकांक्षेत बीज तेच रोवतात.

"लोभ हे सर्व दु:खाचं, त्रासाच मूळ लोभ फक्त पैशाचा नसतो, प्रसिद्धीचा व माणसांचाही असतो"
“लोभ हे सर्व दु:खाचं, त्रासाच मूळ लोभ फक्त पैशाचा नसतो, प्रसिद्धीचा व माणसांचाही असतो”

मात्र आपल्या मुलाचा तेवढा आवाका आहे कि नाही याचा डोळस विचार ते करत नाहीत. मुलाचा मराठीत पहिला नंबर येतो यावर त्याचं समाधान होत नाही.
त्यानं प्रत्येक विषयात पहिला नंबर मिळवून संबंध वर्गात पहिलं यावं, अशी पालकांची इच्छा असते. मुलाचा पहिला नंबर त्याच्या ज्ञानामुळे यावा, असं कितीशा पालकांना वाटत असेल, शंकाच आहे. मुलापाशी पाठांतराची पढवलेली हुशारी किती आणि खरखुर ज्ञान किती,  याचा शोध घेतला, तर दुसरया प्रश्नाला पूर्ण नकारार्थी उत्तर मिळेल. कारण खर ज्ञान म्हणजे याचा खुद्द पालकाला पत्ता नसतो! त्याची खरी इच्छा काय असते, तर माझ्या मुलान पहिला नंबर काढावा, म्हणजे त्यानं माझ नाव काढल्यासारख होईल! याच वृत्तीला मर्यादा ओलांडणारा लोभ म्हणतात. कितीतरी मुलांना चित्रकलेत किंवा त्यासारख्या एखाद्या विषयात पहिला नंबर असतो; पण या पहिल्या नंबरच पालकांना कौतुक नसतं त्याची खरी इच्छा काय असते, तर माझ्या मुलान पहिला नंबर काढावा, म्हणजे त्यानं माझ नाव काढल्यासारख होईल! याच वृत्तीला मर्यादा ओलांडणारा लोभ म्हणतात. इंग्रजी, गणित, सायन्स अशा विषयामध्ये मुलानं पहिला नंबर काढावा, कारण त्यात प्रतिष्टा असते . त्या विषयामुळे चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असते.
मुलाचा पहिला नंबर हे लोभाचं एक उदाहरण झालं असाच लोभ त्याच्या बापाला ऑफिसमधल्या प्रमोशनबद्दल वाटत असतो. ते मिळाले नाहीतर ज्याला ते मिळालं त्याला नावं ठेवून तो आपलं अपयश, आपली कुवत झाकू बघतो.

हे ही वाचा : Broken Heart Shayari in Hindi