रंग सांगतात तुमच्या स्वभावाचा ढंग

लाइफस्टाइल

जर जीवनात व निसर्गात रंगच नसतील तर कसे वाटेल? विचार करा, फुलांना जर रंगच नसेल, आकाशाला रंग नसेल, तर काय होईल?
रंग हे आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण व प्रतिक आहेत. जर तुमचा मूड प्रसन्न असेल तर त्या दिवशी तुम्ही चमकदार रंग असणारे कपडे घालणे पसंत करता.

कोणत्या रंगाचे फुल तुम्हाला जास्त आवडते?
लाल: जर तुम्हाला लाल रंगाचे फुल जास्त आवडत असेल, तर तुम्ही प्रत्येक वस्तूमध्ये वा बाबीमध्ये प्रेमाचा शोध घेत असता. तुमच्यामध्ये काही तरी नवीन करून दाखविण्याची वृत्ती सळसळत असते.

रंग सांगतात तुमच्या स्वभावाचा ढंग
रंग सांगतात तुमच्या स्वभावाचा ढंग

पिवळा: या रंगाची फुले आवडणारे लोक हे स्वातंत्र्याचे भोक्ते असतात. ते नेहमी आनंदी मूडमध्ये असतात.

गुलाबी: असे लोक प्रत्येक गोष्ट व बाब यातून आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर हे लोक नेहमी इतरांच्या कौतुकाला पत्र ठरत असतात.

पीच; या रंगाची फुले आवडणारे लोक हे स्वप्नात जगणारे असतात, तसेच नेहमी विचार विश्वात दंग असतात.

नारंगी: या रंगाची फुले आवडणारे लोक स्वभावाने फार हावरट असतात.

पांढरा: पांढऱ्या रंगाची फुले आवडणारे लोक सरळ स्वभावाचे असतात. ते स्वच्छतेचे फार भोक्ते असतात.

हे ही वाचा : Sad Shayari in Hindi

Leave a Reply