थकलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी
अनेकदा आपल्या जिभेवर आपले नियंत्रण नसल्याने शरीराला उर्जा, उत्साह, शक्ती मिळवण्यासाठी नेमके काय खाल्ले पाहिजे, याचा विचार आपण अभावानेच करतो. त्याचबरोबर वेगवान जीवनशैलीत आहारातील पौष्टिकता आणि पोषणमुल्यांचा विचार करायलाही आपल्याला वेळ नसतो. त्यातून मग जे जिभेला रुचेल ते खाण्याकडे आपला कल असतो. बहुतेक वेळा आपल्या टिफिनमध्ये भाजी-पोळी आणि राईस असतो. पण समजा जेवणानंतर तुम्हाला उपस्थित राहायचे आहे तर फक्त पोळी-भाजी हा आहार पुरेसा नाही. दमलेल्या स्थितीतून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर आहारासंदर्भातील काही टिप्स:
लोहाच्या कमतरतेमुळे अनेकदा दमल्यासारखे वाटते. पोषणमुल्य नसलेल्या आहारामुळे, शरीरात रक्त कमी असल्यामुळे किंवा आजारपणामुळे असे वाटते, त्यावर मात करण्यासाठी जेवणात हिरव्या भाज्या, शेंगदाणे, सोयाबीन, डाळी यांचा समावेश जाणीवपूर्वक करा. विटामिनच्या रुपात असलेले नैसर्गिक फोलेट हे हिरव्या भाज्या, तेलबियात सापडते. मज्जारज्जु योग्य प्रकारे कार्यरत राहण्यास फोलेट मदत करते. विस्मरण किंवा अल्झायमसारखे विकार टाळण्यासही फोलेटचा उपयोग होतो.
उत्साहासाठी शरीराला झिंकची आवश्यकता असते. पचनशक्ती कमजोर याचाच अर्थ झिंकची कमतरता आहे. चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा नखांवर पांढरे डाग, रेषा आणि केस गळणे. ही झिंकची कमतरता असल्याची लक्षणे आहेत. त्यावर उपाय म्हणजे झिंक चांगल्या प्रमाणात असलेले ओटमील, तेलबिया प्रकारातील धान्याचा आहारात वापर. त्याचबरोबर सीफूड आणि चिकनही झिंकची कमतरता भरून काढते. अनेकदा डाएटच्या नावाखाली आपण शरीरातील कर्बोदके कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आपला स्टेमिना कमी होतो. त्यासाठी होल-व्हीट असलेले अन्नपदार्थाचे सेवन करा.
साखर आहारात मर्यादितच हवी. जास्त साखर शरीरासाठी हानिकारक ठरते.
नियमित अंतराने पाणी पीत राहण्यामुळे आपण उत्साही आणि तरतरीत राहतो.
हे ही वाचा : Love Shayari in Hindi