प्रेमाने करा संसार सुखाचा
ज्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांसोबत जीवन जगण्याचा संकल्प घेतात असे बंधन म्हणजे लग्न. हा संकल्प कधीही खोटा घेतला जात नाही. जरी आपण शरीराने एक झाले असाल तरी जोपर्यंत आपले विचार जुळत नाही तोपर्यंत हे बंधन टिकाऊ होत नसते. जेव्हा आपण आपल्या आवडीनिवडी परस्परांमध्ये वाटून घेता तेव्हाच आपण खरे दांपत्य होता. त्यासाठी कोणत्याही मुद्द्यावरून वाद झाल्यास त्यावर समजुतदारपणे तोडगा काढायला हवा. संसाराचा रथ तेव्हाच व्यवस्थित चालतो जेव्हा त्याची चाके योग्य पद्धतीने फिरतात. काही गोष्टींचे भान राखून आपला संसार प्रेमाने सजवा.
विवहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी भविष्याच्या योजना एकमेकांना सांगून एकमेकांचे विचार जाणून घ्या. कधीही जोडीदाराचा स्वाभिमान दुखावू नका. जोडीदाराच्या शारीरिक क्षमतेची चेष्टा करू नका. अर्थातच ज्यावर नियंत्रण ठेवणे त्याच्या हाती नसेल अशा गोष्टीवरून त्याची मस्करी करू नका. आपल्या जोडीदाराची इतर कोणाशी स्पर्धा करू नका. तसेच त्याच्या स्वभावाची इतरांशी तुलना करू नका. कारण प्रत्येकाचा स्वत:चा दृष्टिकोन असतो. निर्णय घेण्यापूर्वी आपसात विचार विनिमय अवश्य करा. जोडीदाराचे विचार ऐकल्यानंतरच आपली प्रतिक्रिया द्या. रागावर नियंत्रण ठेवा.
घरात कोणतेही काम अर्धवट राहिले असेल तर तक्रार न करता मिळून मिसळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपापसातील प्रेम टिकून राहण्यासाठी परस्परांचा आदर व विश्वास राखणे अत्यावश्यक असते. आपल्या जोडीदाराच्या स्वप्नानां व करिअरला प्राधान्य द्यायला शिका. असे न केल्यास हे बंधन परस्परांना दुखावते. स्वप्ने जेव्हा वास्तवात उतरत नाहीत. तेव्हा नाती बिघडून लागतात. यासाठी जोडीदाराच्या स्वप्नाची व विचारांची कदर करा. यामुळे एकमेकांबद्दलचा आदर नक्कीच वाढेल.
मुलांसमोर कधीही एकमेकांवर वार करू नका. त्यांच्यासमोर रागावर नियंत्रण ठेवा. नेहमी स्वत:चे काम स्वत: करण्यासाठी सवय जडवून घ्या. यामुळे वादाची स्थिती उदभवनार नाही. आपल्या सर्वामध्येच काही उणीवा व काही वैशिष्ट्ये असतात. आपल्या सवयीमध्ये व स्वभावात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.
हे ही वाचा : Good Night Quotes in English