यश प्राप्तीसाठी निश्चित करा एकच ध्येय
अदितीला गाण्याची, नृत्याची मोठी आवड होती. साहित्यातही तिला फार रुची होती. गायिका, नृत्यांगना, लेखिका बनावे अशी तिची महत्वाकांक्षा होती; परंतु तीन तीन ध्येये समोर ठेवल्याने ती कोणत्याच क्षेत्रात पुढे येऊ शकली नाही. आज ती एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून जीवन जगत आहे.
असा प्रकार अनेकांच्या बाबतीत होतो. अंगी गुण असतात. पुढे येण्याची, काहीतरी बनण्याची महत्वाकांक्षा असते; परंतु एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याने हाती काहीच लागत नाही. कशातच पूर्ण यश मिळत नाही. आजचा जमाना हा तीव्र स्पर्धेचा जमाना आहे. ज्या क्षेत्रात जायचे आहे त्याचे पूर्ण ज्ञान असणे हि गोष्ट अत्यावश्यक आहे. जर एकच क्षेत्र निवडले, एकच ध्येय निवडले तरच हे शक्य आहे.
माणसाने एकच ध्येय ठरवावे, एकच लक्ष निश्चित करावे आणि पूर्णपणे त्यात झोकून द्यावे. द्रुढनिश्चय आणि आत्मविश्वासाने कामाला लागावे. प्रगती निश्चितच होत राहील. यश मिळत राहील आणि यथाकाली तो त्या क्षेत्रातील एक वेगळी उंची गाठल्याशिवाय राहणार नाही.
हे ही वाचा : Breakup Shayari in Hindi