सकारात्मक राहा

विचार

परिस्थिती कशीही असू दे सकारात्मक राहण्याची ताकद कधीही कमी लेखात येणार नाही. सकारात्मक मन:स्थिती ठेवण्याची युक्ती कधीही सापडू शकते आणि नंतर ती सवय बनून जाते.

स्वत:चे विचार बदला:
तुमच्या विचारांविषयी नेहमी सजग राहा. विशेषता: जेव्हा आयुष्यात तुमच्या मनासारखे घडत असते तेव्हा ज्या क्षणी तुम्ही नैराश्येच्या गर्तेत जाता त्यावेळी दु:ख, संताप, स्वत:विषयी न्यूनगंड निर्माण होतो. अशावेळी तुमच्याशी संबंधित नसलेल्या निराळ्याच विषयासंदर्भात विचार करा. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्याचे वैशिष्ट्य  म्हणजे आपण आपले विचार नियंत्रित करू शकतो आणि स्वत:बद्दल विचार करू शकतो.

सकारात्मक राहा
सकारात्मक राहा

काय धडा मिळाला हे शोधा:
प्रत्येक स्थितीत काही तरी शिकायला मिळत असते. मग ती घटना दुर्दैवी असली तरी त्यात काहीतरी मेसेज असतो. अनेकदा अशा प्रकारे धडा शिकणे हे महागात पडलेले असते, पण कुठल्याही घटनेतून तुम्ही काय शिकला हे महत्त्वाचे असते. तुमच्याकडून  चूक होऊ शकते, पण ती मान्य करण्याचा मोठेपणा देखील असला पाहिजे. त्यातून मग पुढच्या वेळी तुम्ही वेगळा आणि योग्य निर्णय घेऊ शकाल.

कृतज्ञता व्यक्त करा:
तुम्ही एकाच वेळी कृतज्ञता आणि संताप व्यक्त करू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील आशीर्वाद आणि चमत्कार मोजायला सुरुवात करा. तुम्हाला आणखी काही अशा घटना आठवू लागतील तुम्ही जिवंत आहात आणि श्वास घेत आहात हीच जगातील केवढी मोठी गोष्ट असते. आपण जिवंत असणे यासारखा आनंद नसतो. त्यामुळे कधीही फार काळजी करत बसू नये. प्रत्येक टप्प्यावर जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा.

सकारात्मक दृष्टी :
स्वत:कडे सकारात्मक आणि आत्मविश्वासाने पाहण्याचा सराव करा. तुमच्याकडे काही मिनिटांचा वेळ असेल तेव्हा कुठेही हा सराव करण्यास हरकत नाही.  स्वत:बद्दलची सकारात्मक विधाने आणि सकारात्मक प्रतिमा पाहायला शिकणे म्हणजेच तुम्ही नकळतपणे स्वत:कडे सकारात्मकतेच्या प्रकाशझोतात पाहण्याची सुरुवात आहे. हे आवश्यक आहे, कारण आपल्यापैकी प्रत्येकजण स्वत:विषयी  इतका निष्टुर असतो की आपण आपल्या चागल्या गुणांकडे कधी शांतपणे बघत नाही, स्वत:च्या गुणांचे, कामाचे कौतुक करत नाही.

आठवणींचा साठा:
तुमच्या चेहरयावर क्षणार्धात हसू फुलवेल इतका ताजा आणि प्रचंड असा आठवणींचा साठा तुमच्याकडे असला पाहिजे.
कधी तुम्हाला प्रचंड आनंद झाला होता, तुम्ही खळखळून हसला होता, तुमचे कौतुक झाले होते अशा घटना मनाच्या कोपरयात जपून ठेवा. कधीही त्या तुमच्या मदतीला येऊ शकतात.  तुम्ही जेव्हा कधी नाराज असाल, निराश असाल तेव्हा या आठवणी तुमचा मूड बदलून टाकण्यासाठी उपयोगी पडतात. त्यातून तुम्हाला परिस्थितीची संतुलित कल्पना येऊ शकते. 

Leave a Reply