फिट राहण्यासाठी या वाईट सवयी सोडा
आरोग्याच्या दृष्टीने लोक घरी खूपच कटाक्षाने आरोग्याचे नियम पाळतात परंतु; ऑफिसमध्ये मात्र, आरोग्याशी खेळत असतात. सकाळचा नाश्ता णा करणे व वारंवार कॉफी पिणे यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देतात. जर आपण ऑफिसमध्ये आरोग्य जपाल तर जीवघेण्या आजारांपासून तसेच स्थुलतेपासून दूर राहू शकतात .
नका करू या चुका
नाश्ता न करणे:
आपण नाश्ता न करण्याचा दोष ऑफिसच्या माथी मारत असतो. बरेचजण ऑफिसमध्ये लवकर जायचे म्हणून नाश्ता टाळतात. यामुळे आपण लंचटाइम पर्यंत खूप भुकेले राहतो आणि एकाच वेळी भरपेट खाण्यामुळे स्थूलता वाढते.

सीटवर खाणे :
काही वेळेला हॉटेलातील स्नॅक्स आणून आपल्याच सीटवर खालला जातो तेव्हा तो एक तर खूप तळलेला असतो वा जास्त खारट असतो. असा आहार आपल्याला नेहमी सोबत फळांनी व भाज्यांनी भरलेला बॉक्स ठेवावा व भूक लागल्यास ते खाणे खाल्ल्यानंतर ऑफिसमध्येच थोडे फिरावे, खाल्लेले व्यवस्थित पचेल .
उशिरा लंच :
प्रत्येक जेवणाची एक वेळ असते ; पण ऑफिसमध्ये आपल्या खायच्या सवयी पार बदलून जातात. जर वेळेवर जेवला नाही तर दिवसभर पोट जड वाटेल. यामुळे मेटाबालिजम मंदावेल व स्थुलता वाढेल. यासाठी घरी ऑफिसमध्ये आपल्या जेवणाच्या वेळा पाळा.
कॉफी ब्रेक :
जादा कॉफी ब्रेक म्हणजे जास्त कॉफीचे सेवन. जर आपण रोज खूप कॉफी प्याल तर दिवसभरात १०० कॅलरी ग्रहण कराल. तसेच जास्त कॉफी प्यायल्यामुळे झोपही येत नाही. त्यामुळे सकाळी उशिरा उठाल व नाश्त्याला सुट्टी द्याल.
बाहेरचे खाणे
काहीजण ऑफिसमध्ये लंच घेऊन येत नाहीत . कारण त्यांना ते विचित्र वाटते; पण रोज-रोज बाहेरचे जेवणे म्हणजे अस्वच्छ व जास्त कॅलरीयुक्त आहाराला आमंत्रण देणे असते.