गुरुवारी जन्मलेल्यांसाठी हे रंग जास्त लाभदायक! पण हे दोन रंग गुरुवारी वापरणे टाळा?

लाइफस्टाइल

ज्योतिषशास्त्रानुसार रंगांचा आपल्यावर जीवानावर विशेष परिणाम होतो. आपण ज्या रंगाचे कपडे घालतो किंवा आपल्या घराचा जो रंग असतो त्याचा आपल्यावर आयुष्यावर परिणाम होतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही राशीनुसार योग्य रंगांची निवड केली तर आय़ुष्यात चांगले यश येते आणि चुकीचा रंग निवडल्यास नुकसान होऊ शकते.

ज्योतिषशास्त्रात कोणत्याही दिवशी रंग निवडावा हे देखील सांगितले आहे. तुमच्या जन्माच्या आणि राशीच्यानुसार रंगाची निवड केल्यास तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात.

गुरुवारचा वापरण्याचा तुमच्यासाठी शुभ रंग कोणता?

प्रत्येकाच्या कुंडलीत गुरु ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे तसेच गुरु ग्रहाचा तुमच्यावर जास्त प्रभाव दिसून येतो, गुरुचे पाठबळ चांगले असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले यश येते, प्रत्येक कार्यात यश येते त्यामुळे ज्यांच्या राशीचा स्वामी गुरु आहे, त्यांच्यासाठी गुरु ग्रहाचा प्रभाव जास्त बघायला मिळतो. गुरू ग्रहाचा रंग पिवळा किंवा पिवळा-नारंगी आहे. या रंगांचा व्यक्तीवर गरम प्रभाव पडतो असे मानले जाते. मानवी शरीराच्या मज्जासंस्थेला ऊर्जा देण्यासाठी हा रंग सर्वोत्तम मानला जातो. तुम्हाला तुमच्या कुंडलीत गुरू मजबूत करायचा असेल तर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावे. तुम्ही पिवळा पुष्कराज देखील धारण करू शकता.

पिवळा रंग मानला जातो शुभ

गुरुवारी जन्म झालेल्या जातकांवर गुरुचा प्रभाव जास्त असतो. हे लोक स्वभावाने मयाळू असतात. तुमच्यासाठी पिवळा रंग सर्वोत्तम मानला जातो. पिवळ्या रंगाचे कपडे घातल्यास तुमच्या जीवनात यश सौभाग्य येऊ शकते. तुम्ही पूजा किंवा लग्न अशा शुभ कार्यात हे रंग वापरू शकता.

केशरी रंग असतो शुभ

गुरुवारी जन्म झालेल्या जातकांसाठी केशरी रंग शुभ मानला जातो. हा रंग तुमच्या जीवनात ऊर्जा आणतो असे मानले जाते. तुम्हाला जीवनात तणाव वाटत असेल तर तुम्ही केशरी रंगाचे कपडे वापरावेत. त्यामुळे तुमच्यामधील ताणतणाव दूर होण्यास मदत होते.

लाल रंगाचा करा वापर

गुरुवारी जन्म झालेल्या जातकांसाठी लाल रंग जास्त फलदायी ठरू शकतो. लाल आणि पिवळा रंगाच्या मिश्रणाने केशरी रंग तयार होतो त्यामुळे लाल रंग देखील सर्वात शुभ मानला जातो. त्यामुळे गुरुवारी जन्म घेतलेल्या जातकांनी लाल रंगाचे कपडे वापरावे.

गुरुवारी जन्म झालेल्या जातकांनी हे दोन रंग वापरू नयेत

समजा तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर तुम्ही काळा रंगाचा वापर करू नका, तुम्ही जर कोणत्याही प्रसंगी काळ्या रंगाचा वापर केल्यास मानसिक ताण येऊ शकतो आणि त्याचा तुमच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मानले जाते.

तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल आणि एखाद्या मुलाखतीसाठी जात असाल तर किमान गुरुवारी काळे कपडे घालू नका. हा रंग तुम्हाला मिळणाऱ्या यशापासून तुम्हाला थांबवू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी जन्मलेल्या लोकांनी निळा रंग देखील टाळावा. गुरुवारी निळ्या रंगाचे कपडे वापरणे टाळावे नाहीतर तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार नाही.