प्रेम वगैरे सर्व खोटे; सर्व काही केमिकल लोचा आहे

रिलेशनशिप

एखादी व्यक्ती आपल्याला प्रिय का वाटते? शरीरातील टेस्टोस्टेरॉन  होर्मोनचा जास्त स्त्राव एखाद्याकडे आपल्याला आकर्षित करतो वा त्याविषयी आपल्याला जास्त आपलेपणा वाटू लागतो
अमेरिकेतील प्रेयरी बोल नामक प्रजातीच्या उंदरावर संशोधन करून शास्त्रज्ञानी हा निष्कर्ष काढला आहे  कि, मनुष्य जातीवर प्रेम व मादकता यांचा प्रभाव ऋतुंप्रमाणे कमी जास्त होतो.

प्रेम वगैरे सर्व खोटे; सर्व काही केमिकल लोचा आहे
प्रेम वगैरे सर्व खोटे; सर्व काही केमिकल लोचा आहे

वसंत ऋतूत मनुष्यामध्ये सर्वाधिक मादकता निर्माण होते. या कारणामुळे शरीरात हे नायट्रिक ऑक्साईड नामक हार्मोन स्त्रवीत होते. हे हार्मोन मेंदूच्या कार्यप्रणालीला उत्तेजित व नियंत्रित करण्यामध्ये न्यूट्रो  ट्रान्समीटर प्रमाणे कार्य करते. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, एकदा नायट्रिक ऑक्साईड एंझाईम्स नष्ट झाली की परस्परांना बिलगून बसलेली जोडपी वेगवेगळी व दूर होतात. याचाच अर्थ सजीव प्राण्यातील प्रणयाराधना ही काही केमिकल्स द्वारे संचालित केली जाते. जस्टिन गार्शिया या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, काही लोकांच्या जीन अर्थात डीएनए रचनेमध्ये जोडीदाराला दगा देणारा डोपामाईन रिसेप्टर डी-४ नामकजीन असतो. या जीन्सची जास्त सक्रियता त्या व्यक्तीच्या मेंदूवर थेट परिणाम घडविते व तिचे वागणे बदलते त्यामुळे प्रेम प्रकरणात ट्विस्ट निर्माण होतो  व जोडी फुटते. त्याचबरोबर या प्रभावाने व्यक्तीमध्ये क्रूरता निर्दयीपणा व गुन्हेगारी प्रवृतीचाही जन्म होतो.

तुम्हाला अचानकपणे एखादी अनोळखी व्यक्ती उगाचच आपल्या जवळची का वाटू लागते. असे का होते? शरीरातील  टेस्टोस्टेरॉन  होर्मोनचा जास्त  स्त्राव एखाध्याकडे आपल्याला आकर्षित करतो वा त्याविषयी आपल्याला जास्त ममत्व वाटू लागते.

मेंदूतून फॉस नामक प्रोटीन निर्माण होते हे प्रोटीन स्नायुपेशींना सक्रिय करते. अशा स्थितीत दोन भिन्नलिंगी लोक एकत्र येतात तेव्हा हे हार्मोन दोघांना चुंबकाप्रमाणे एकमेकांना आकर्षून घेते. यालाच म्हणतात, आग दोन्ही बाजूना एकाचवेळी लागलेली आहे ! विस्तवाजवळ लोणी नेले तर ते वितळणारच.

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Love Quotes in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल.

जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status संग्रह आपल्यासाठी आहे. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट Marathi Love Status संग्रह.

Leave a Reply