व्हिटॅमिन सी व त्वचेचे आरोग्य

आरोग्य ज्ञान

त्वचा सुंदर बनविण्यासाठी व चेहरा आकर्षक बनविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. स्वस्थ त्वचेसाठी व्हिटॅमिन  सी सर्वात चांगला उपाय आहे. दररोज एक ग्लास संत्र्याचा ज्यूस पिणे आपणासाठी व्हिटॅमिन  सीचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी हे फायदेशीर आहे. याने त्वचेमध्ये टव ट्वी येते. याचबरोबर त्वचेसाठी व्हिटॅमिन  सी युक्त प्रसाधनांचा उपयोग करता येईल.

व्हिटॅमिन सी व त्वचेचे आरोग्य
व्हिटॅमिन सी व त्वचेचे आरोग्य

आजकाल बाजारामध्ये व्हिटॅमिन  सी युक्त स्क्रीन केअर प्रॉडकट्स  पूर्ण रेंजमध्ये उपलब्ध आहेत. व्हिटॅमिन  सीच्या बारीक कणांनी युक्त क्रिमने त्वचेची सफाई होते व मृतपेशीपासून सुटकाही मिळते. याच्या नैसर्गिक सिट्रस तत्वांनी त्वचेला चमक येते आणि ताजेतवाने वाटू लागते. त्वचेला नवीन जीवन देण्यासाठी व्हिटॅमिन  सी युक्त मॉईश्चरायजरचाही उपयोग केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले एप्रीकॉट ऑइल त्वचेला नरम-मऊ  बनवून त्वचेचे पोषण करते. ज्यामुळे त्वचेला नवीन जीवन मिळते. आठवड्यातून एक वेळ या नॉन  ड्राईग फॉर्मुल्याचा उपयोग केल्याने त्वचेला चमक येते. क्लीजिंग मिल्कने त्वचा चांगल्याप्रकारे साफ केल्यानंतर त्वचेमध्ये नवी शक्ती आणण्यासाठी व त्वचेच्या पोषणासाठी  व्हिटॅमिन  सी युक्त मॉईश्चरायजर लावावे. याने त्वचा नरम तर राहतेच याचबरोबर कोमलताही वाढते.

Leave a Reply