… म्हणून होतो ब्रेकअप ! आणि त्याला तुम्हीच जबाबदार असता
प्रेमात जोडीदारांच स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका, त्याचे विचार बदलण्याचा हट्ट करू नका, तसं केलंत तर ‘ब्रेकअप’ ठरलेलाच आहे.
जमाना बदलला, पण प्रेमात पडणं आणि प्रेमभंग होणं या गोष्टी काही बदललेल्या नाहीत. अपयशी ठरलेल्या प्रेमिकांनी एकमेकांवर दोषारोप करत राहाण्याची जुनी (आणि अपरिपक्व) पद्धतही आधुनिक काळात कायम आहे. बाकी प्रेम आंधळं असतं हेच खरं. ते प्रेमिकांना आंधळं आणि असमंजस बनवतं, हेही खरं, प्रेमभंग होतो तेव्हा आपल्या चुका समजून घेणं, त्या कबुल करून दुरुस्त करण्याची तयारी दाखवणं किंवा सुरुवातीला आपलं जमलं खरं, पण लग्न करून कायम एकत्र राहणं आपल्याला शक्य नाही, कारण आपले स्वभाव भिन्न आहेत, हि वस्तुस्थिती किती प्रेमिक मान्य करतात? कितीपण सदिच्छा कायम ठेवून, खिलाडूपणे एकमेकांचा निरोप घेतात? नकार खपवून घेतात?

काही थोडे प्रेमिक असे असतात, की आपलं काय चुकलं, त्यांना कळत नाही. त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांचा जोडीदार त्यांचा निरोप घेतो. अशा प्रेमिकांनी या निरोपाची काही कारणं माहित करून घेणं आवश्यक आहे. यापैकी नक्की कशामुळे आपला जोडीदार दूर झाला, हे समजून घ्यावं. आपल्यातला दोष दूर करण्याची हमी घेतली, तर कदाचित ते निरोप टाळू शकतील. निदान पुन्हा योग्य माणूस भेटलं, तर या चुकांची पुनर्व्रती होऊन पुन्हा निराश होण्याचा दुख:द प्रसंग टाळता येतील. म्हणून ‘ब्रेकअप’ मागची संभाव्य कारणं दुसऱ्या जोडीदाराच्या दृष्टीकोनातून समजून घेणं आवश्यक आहे. प्रेमाला अपयश देणारा असा कोणता दोष तुमच्यात आहे, शोध बरं ! संभाव्य कारणं आहेत :
गुदमर झाला असेल :
तुम्ही नकळत आपली मतं, आपल्या आवडीनिवडी आपल्या जोडीदारावर लादत तर नव्हता? प्रेमात माणसं एकमेकांवर सत्ता गाजवतात. काही अशी ती सुखदही असते, पण एका मर्यादेपर्यंतच. दुसऱ्या व्यक्तीनं काय खावंप्यावं? कोणते कपडे घालावेत, कुणाशी मैत्री ठेवावी? याबद्दल काही बंधनं घातलीत, तर तुमचा जोडीदार ती खपवून घेणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्या आयुष्यात येण्याआधी जी माणसं त्याच्या किवां तिच्या जीवनात आली आणि परिस्थितीनुसार तिचे /त्याचे जे विचार, जी मतं पक्की झाली, ती बदलण्याचा आग्रह धरू नका. तुमच्या जोडीदाराला त्यामुळे घुसमटल्यासारखं, गुदमरल्यासारखं होईल. दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर, विचारांवर, स्वातंत्र्यावर आक्रमण करू नका. तसं केलंत, तर तुम्ही प्रेम गमावून बसाल.
अपेक्षाभंग:
माणूस आहे तसा स्वीकारणं, हा कोणतंही नातं जोपासण्यातला प्राथमिक नियम आहे. जे त्याला/तिला जमणार नाही, ते तिच्याकडून करवून घेण्याचा अट्टाहास करू नका. तुमच्यावर कुणी अशी सक्ती केली, तर तुम्हाला आवडेल का? भलत्या अपेक्षा ठेवून त्यानुसार त्या व्यक्तीला ‘घडवण्या’चा प्रयत्न करू नका. अन्यथा भलत्या अपेक्षांचा भंगच होईल आणि त्याबरोबर तुमचा हृदयभंग होईल आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल.
थोडी मोकळीक हवी:
प्रेमामुळे तुमच्यात कितीही समानता निर्माण झाली तरी एकजीवता निर्माण होणं कठीण आहे. वयात आलेली प्रत्येक सज्ञान व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे जगण्याची इच्छा बाळगते. आपल्या मतानुसार सुखानं जगू देणारा जोडीदार शोधू बघते. तुमच्याशी खूप मिळतेजुळते विचार, जिवनमूल्यं व जीवनशैली असणारा जोडीदार तुम्हाला भेटला, तरी तो सदासर्वदा तुमच्या मनाप्रमाने वागेल; सतत तुमच्याबरोबर राहील अशी बालिश अपेक्षा करू नका. काही वेळा तिला/त्याला आपले कुटुंबीय, मित्र व ऑफिसचं काम यांना प्राधान्यं देणं भाग असतं. त्याला क्रिकेट मॅच बघणं आवडत असेल, पण तुम्हाला त्या खेळाची आवड नसेल, तर त्यानं मॅच बघणे सोडून तुमच्याबरोबर राहावं अशी अपेक्षा ठेवू नका. बघ ध्या कि त्याला एकट्यानं मॅच !
त्यानंही तुमच्यावर मॅच बघण्याची सक्ती करू नये. तो वेळ तुम्ही तुमच्या राहिलेल्या इतर कामांना ध्या. दुसरीकडे मन रमवा. एकमेकांना वेळोवेळी मोकळीक दिली नाहीत, तर प्रेम म्हणजे बेडी ठरेल आणि कधी न कधी एक जोडीदार ती उखडून टाकीलच.
हे ही वाचा : Sad Quotes in Hindi