नात्यात संशयी, मत्सरी जोडीदाराला कसं हाताळाल?
नात्यात संशयी, मत्सरी जोडीदाराला कसं हाताळाल?
नात्यामध्ये जोडीदाराचा स्वभाव संशयी,मत्सरी असला तर अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या जोडीदाराच्या अपोझिट सेक्सच्या मित्राबद्दल त्याला/ तिला खूपच मत्सर वाटू लागला तर गंभीर प्रश्न निर्माण होतात. सर्वप्रथम हा एक प्रोब्लेम आहे, हे मान्य करा. त्या संदर्भात मार्ग काढायची तयारी असेल तर त्या प्रश्नावर चर्चा करा.
स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहा
मत्सर करण्याचा जोडीदाराचा स्वभाव आहे, म्हणून स्वत:च्या वागण्या-बोलण्यात बदल करू नका किंवा जोडीदाराला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला/ तिला त्या प्रश्नातून बाहेर येण्यासाठी वेळ ध्या, मदत करा.
मत्सर का वाटतो ?
असुरक्षिततेमध्ये मत्सराची बीजं दडलेली असतात. जोडीदारात आत्मप्रतिष्ठा कमी असेल तर त्याविषयी एकत्र बोला, चर्चा करा, त्यामागचं कारण जाणून घ्या. असाच प्रसंग निर्माण झाल्यास त्या परिस्थितीशी कसं जुळवून घेणार आहात, याचा आत्ताच विचार करा.
प्लॅन तयार ठेवा
नात्यात दुरावा निर्माण होण्याचा प्रसंग आला तर त्या वेळी आपण कसे वागणार आहोत ते आधीच ठरवून ठेवा आणि त्या भूमिकेवर ठाम राहा. अशी तयारी असली तर नात्यातले चढ-उतार व्यवस्थित हाताळता येतात.
मदत मागा
जर कुठल्याच उपायाचा फायदा होत नसेल, तर अशा वेळी रिलेशनशिप कौन्सेलरची मदत घेणं चांगलं. एक्सपर्टचा सल्ला हा दोघानाही फायद्याचा ठरू शकतो आणि त्यांनी सुचवलेलं सोल्युशन दोघानाही मान्य होऊ शकतं.
हे ही वाचा : Sad Status in Hindi