यशस्वी होण्याकरिता हे गुण हवेत ….
इच्छा : ध्येय सध्या करण्यासाठी प्रबळ इच्छा हवी. माणसाच्या मनामध्ये जे रुजतं किंवा माणूस जे मनात आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट सध्या करू शकतो.
जबाबदारी: यशस्वी माणसं जबाबदाऱ्या स्वीकारतात. बहुतांश लोक आपापल्या सुरक्षित कवचात राहतात आणि कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत. त्यामुळे ते यशस्वी होत नाहीत.
कठोर परिश्रम : कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हेन्नि फोर्ड म्हणतो, जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशीबवान व्हाल. सामान्य माणूस शक्तीच्या आणि क्षमतेच्या एक चतुर्थांश काम करतो.
चारित्र्य : यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची गरज असते. या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त असतो. हे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहतात. असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात.
सकारात्मक विश्वास : सकारात्मक विश्वास हा सकारात्मक विचारापेक्षा खूप श्रेष्ट असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल असे निश्चितपणे वाटणं म्हणजे सकारात्मक विश्वास.
चिकाटी : चिकाटीची जागा दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकणार नाही. बुद्धिमत्ताही घेऊ शकणार नाही.
आपल्या कौशल्याचा अभिमान : आपल्या कौशल्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि केलेले काम चांगलं झाल्याचे समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे एखादे काम चांगले केल्यामुळे वाटणारं समाधान हेच खरं बक्षीस असते.