अकस्मात नोकरी गेली तर काय कराल?

लाइफस्टाइल
  • आर्थिक नियोजन आवश्यक, कर्जाचे हप्ते थकवू  नका, मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे लागू नका.
  • टोकाचे निर्णय घेऊ नका, नवी कौशल्ये आत्मसात करा, आधीच्या कंपनीबद्दल वाईट बोलू नका.
  • तात्पुरत्या फायद्यासाठी स्वत:ची बोली लावून किमंत कमी करू नका.

आजच्या नोकरदार वर्गाच्या मनात सर्वात मोठी दहशत असते ती पिंक स्लिपची. पिंक स्लिप हातात पडणं याचा अर्थ जॉब गेल्याची ती सूचना असते. आर्थिक मंदीमुळे असो वा आणखी काही कारणामुळे जॉब गेल्यावर काही अक्षम्य चुका नक्कीच टाळायला हव्यात. त्याचबरोबर जॉब गेल्यावर आर्थिक नियोजन कोलमडू न देता परिस्थितीशी जुळवून घेत पुढचा मार्ग शोधायला हवा.

मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचं धोरण अमलात आणायला सुरवात केली आहे. मोठ्या कंपन्यांचं अनुकरण छोट्या कंपन्याही करू लागल्याने जगाच्या आणि देशातल्या जॉब मार्केटमध्ये कमालीचं तंगीच वातावरण आहे. या प्रकारच्या बातम्यांनी नोकरदार वर्गाच्या मनात जॉब जाण्याची सर्वात मोठी भीती आहे.

अकस्मात नोकरी गेली तर काय कराल?
अकस्मात नोकरी गेली तर काय कराल?

लक्षणं लक्षात घ्या
समजा नजीकच्या काळात जॉब जाण्याची शक्यता निर्माण झाली, तर त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रत्येकाने  काही प्रमाणात तरी तयारी करायला हवी. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि पिंक स्लीप हातात पडणं ही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. काही वेळा जबाबदारी सांभाळण्यात सक्षम नसणं, कामात लक्ष नसणं, निष्काळजीपणा अशी काही कारणंही असू शकतात त्याचबरोबर कंपनीचा मॅनेजर  बदलणं, कंपनीच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय, आर्थिक मंदी ही बाह्य कारणही असू शकतात.

सॅलरी इन्क्रिमेंन्ट किंवा प्रमोशन न मिळणं. कर्मचाऱ्याच्या परफॉर्मन्सबद्दल मॅनेजमेन्ट असमाधानी असणं हि लक्षात घ्यावी अशी काही लक्षणं आहेत. अशा कर्मचाऱ्याच्या हातात नजीकच्या काळात पिंक स्लिप टिकवली जाण्याची दाट शक्यता असते. काहीवेळा कंपनी संबंधित कर्मचारी कंपनीत कामाला नाही असं धोरण स्वीकारते. म्हणजे त्याच्यापेक्षा ज्युनिअरला प्रमोशन देण्यात येतं किंवा ज्युनिअरला  ट्रेन करण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. हि धोक्याची लक्षणं आहेत.

या परिस्थितीला कसं सामोरं जावं?
नजीकच्या काळात जॉब जाण्याची शक्यता निर्माण झाली किंवा तशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, तर संयम न सोडता किंवा धीर न घालवता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा. जर मॅनेजमेन्टने स्पष्टपणे सांगितलं नसेल, तर जॉब सोडण्याची तयारी करण्याची गरज नाही. शक्यता असेल की एमिजिएट बॉसला तुमच्याबद्दल काही प्रॉब्लेम असू शकतात. त्याचा तुमच्या कंपनीतल्या एकूण प्रगतीवर परिणाम होण्याशी शक्यता नसते. जर घाईने जॉब सोडण्याचा निर्णय घेतला तर तुमचं नुकसान होईल आणि तुमच्यावर नाराज असणाऱ्या सिनिअर सहकाऱ्याचा फायदा होईल.

काय कराल?
जर नजीकच्या काळात आपला जॉब जाणार हे जवळपास नक्की असेल, तर हातातला जॉब न सोडता दुसऱ्या चांगल्या जॉबचा शोध घ्यावा. याचं  कारण हातात जॉब असल्यावर बार्गेनिंग करण्याची संधी जास्त असते असं एक्सपर्ट म्हणतात. त्याचवेळी योग्य आर्थिक नियोजन करून केवळ आवश्यक खर्चालाच प्राधान्य देऊन पैसे वाचवण्यावर भर द्यायला हवा. महिन्याचं उत्पन्न आणि आवश्यक खर्च लक्षात घेऊन आकस्मिक निधी तयार करायला हवा. अचानक जॉब गेला तरी किमान सहा महिने टिकून राहण्याची क्षमता या आकस्मिक निधीत असणं आवश्यक आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर दर महिन्याला कर्जाचे हफ्ते देत असाल तर त्यात खंड पडायला नको. कितीही बिकट परिस्थिती असली तरी कर्जाचे हफ्ते न देणं हा त्यावरचा उपाय नाही. जॉब गेल्यावर गोंधळलेल्या मन:स्थितीत अनेकजण स्वत:जवळची गुंतवणूक रिअल इस्टेट किंवा इक्कीटिज विकण्याची घाई करतात. ज्यांचा अकस्मात जॉब जातो ते हि चूक हमखास करतात. एक्सपर्टच्या म्हणण्याप्रमाणे हे निर्माण झालेल्या परिस्थितीवरचं  उत्तर नाही. एक्सपर्टच्या  म्हणण्याप्रमाणे समजा पिंक स्लिप मिळाल्यास आधीच्या कंपनीशी संपर्क  साधावा. इंडस्ट्रीत स्वत:चा रेझ्युमे सर्क्युलेट करावा. नवा जॉब शोधताना नवी कंपनी हि आधीच्या कंपनीपेक्षा लहान असेल याकडे लक्ष ध्यावं. ” अशी कंपनी तुमची चांगल्या पोझिशनवर नेमणूक करू शकते. याचं कारण तुमच्याजवळ असलेल्या अनुभवाचा, मोठ्या सेट अपमध्ये काम करण्याच्या अनुभवाचा त्या कंपनीला फायदा होईल याची कंपनीला खात्री असते, ” असं एक्सपर्ट म्हणतात.

आणखी घ्यायची काळजी म्हणजे अस्थिर परिस्थितीवर मात  करण्यासाठी कधीही छोट्या फायद्यासाठी स्वत:ची बोली लावू नका. याचा तुमच्या क्षमतेवर परिणाम होईल, धीर धरा आणि योग्य संधीची वाट बघा.

Leave a Reply