आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे सोपे उपाय

लाइफस्टाइल

आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करा

१) जेव्हा तुम्ही खोलीत चालत असता तेव्हा दोन पावले टाका आणि थांबा.शांतपणे मान वळवून सभोवताली पहा.नेमके कशाकडेच पाहू नका.अगदी दोन-तीन सेकंदच हि कृती करा आणि तुम्हाला जिकडे जायचे आहे तिकडे जा.

२) गुडघ्यात वाकून जड वजन उचला आणि चेहरा तणावरहित शांत ठेवा. आयुष्यात कशाही घटना घडू देत तुम्ही शांत आणि आत्मविश्वासू असले पाहिजे.

३) तुमचा जबडा आरामदायी स्थितीत असला पाहिजे.नेहमी जीभ तोंडातील वरच्या भागाला टेकलेली असावी.

आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे सोपे उपाय
आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे सोपे उपाय

४) ताठ उभे राहण्यामुळे आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो.त्यामुळे तुम्ही शांत,निवांत आणि आत्मविश्वासपूर्वक उभे राहता .

५) जागा व्यापा, तुमच्या शरीराची हालचाल करा.विस्तार करा. आक्रसून बसू नका.

६) प्रत्येक गोष्टी सावकाश करा. तुमचे शरीर,मान,डोके सावकाश हलवा.सावकाश आणि दमदार पावले टाकत चाला.

७) डोळे सरळ ठेवा. परिस्थितीने विचलित होऊन इकडेतिकडे पाहणे टाळा. जर तुम्हाला उजवीकडे वळायचे असेल तर पहिल्यांदा तुमचे शरीर उजवीकडे वळवा.

८) पाठीमागे काहीतरी फुटल्याचा किंवा पडल्याचा आवाज आला तर लगेच मागे वळून पाहू नका.स्वतःवर नियंत्रण ठेवून मागे वळा.

हे ही वाचा : Sad Status in Marathi