या गोष्टींची काळजी करत बसू नका

लाइफस्टाइल

आपले उद्या काय होईल,आपली मुले व्यवस्थित शिकून नोकरी करतील का?या सारख्या प्रश्नांची चिंता करणे हे निरर्थक आहे .

१) तुमचे भविष्य: आजचा दिवस हेच तुमचे भविष्य आहे.आजचा दिवस तुम्ही सत्कारणी लावला तर तो नक्कीच तुमच्या भविष्याची काळजी घेणारा असतो.

२) राजकीय वातावरण: सध्याच्या राजकारणाशी तुमचा संबंध येतच असतो.तुम्हालाही सोयीची नव्हे तर योग्य भूमिका घ्यावी लागते.तुम्ही इतरांसाठी ठाम भूमिका घेऊन उभे राहिलात तर ते देखील तुमच्यासाठी ठाम भूमिका घेऊन उभे राहतात.आपण सगळ्यांनीच योग्य काम केले तर शेवट योग्य होईल.

३) तुमची निवृत्ती: कदाचित तुम्ही त्याचाच विचार करत असाल.तुम्ही आत्ता किमान बचत करू लागला तर भविष्यात चांगले दिवस पाहायला मिळतील.

या गोष्टींची काळजी करत बसू नका
या गोष्टींची काळजी करत बसू नका

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.

४) मुले कशी निघतील?: मुले कशी निघतील हे तुम्ही आता कसे वागता,जास्तीत जास्त त्यांच्या सहवासात राहता आणि उदाहरणातून त्यांना शिकवण देता त्यावर अवलंबून असते. तुम्ही तोंडाने काही सांगायला गेला तरी तुम्ही अपयशी ठरणार हे निश्चित. मुलांमध्ये सकारात्मक वृत्ती विकसित करा.त्यासाठी तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात कायम सकारात्मकता असली पाहिजे.त्यांना उदारता, आदरातिथ्य, दुसऱ्याचा विचार करणे अशा गोष्टी तुमच्या वागण्यातून शिकता आल्या पाहिजेत.मग काहीच काळजी करू नका. ती तुमच्यापेक्षा चांगली निघतील.

५) वयोवृद्ध आईवडील: मानवी जीवनाचे एक चक्र असते. त्यातून सगळ्यांना जावे लागते.त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या. परस्परांशी बोला,हास्यविनोद सांगा,किस्से सांगा, एकत्र भोजन करा,फिरायला जा, नव्या गोष्टी शिका. आयुष्य हे काही फार मोठे नसते. ते किती आनंदाने जगायचे आणि चांगल्या आठवणी साठवून ठेवायच्या हे आपल्यावरच अवलंबून असते.

६) दुष्प्रवृत्तीच्या व्यक्ती: दुष्प्रवृत्तीच्या लोकांपेक्षा चांगल्या प्रवृत्तीचे लोक जगात जास्त आहेत.तुम्ही सगळे मिळून हि पृथ्वी चांगल्या स्थितीत ठेवू शकता? संकटाच्या समयी एकदिलाने उभे राहून चांगुलपणाची मशाल जगाला दाखवू शकता?

हे ही वाचा : Attitude Status in Marathi