वेळेचे नियाजन अश्या प्रकारे करा आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही

लाइफस्टाइल

वेळेचे नियाजन अश्या प्रकारे करा

आपल्या वेळेचा उपयोग आपण कसा करतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.काम मग ते अभ्यासाचं असो,नोकरी,व्यवसाय असो,त्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं.
प्रत्येक कामाची ठरलेली वेळ असते त्यापेक्षा कमी वेळ दिला,तर ते काम पूर्ण होणार नाही आणि जास्त वेळ दिला,तर इतर कामांना वेळ कमी पडेल.यासाठी वेळेचं वेळापत्रक आखणं गरजेचं असतं.

सवयीनं वेळेचीही बचत होते :

एकच काम सवयीने कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त सफाईने करण्याची सवय लागली,तर वेळेची बचत होते.सर्वात महत्वाचं म्हणजे हा वेळ तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी देऊ शकता. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्यासाठीच वेळ काढायला विसरतो.काम होतच राहतात,पण त्यात आपला बाली जाऊ देऊ नका.आपल्या आवडीच्या कामांसाठी वेळ काढणे म्हणजे स्वतःला रिचार्ज करण्याची संधी असते.ती हातची दवडू नका.

अभ्यास असो व नोकरी वेळेचा कायदा पाळावाच लागतो
अभ्यास असो व नोकरी वेळेचा कायदा पाळावाच लागतो

गेलेली वेळ पुन्हा येत नाही:

वेळ अतिशय मूल्यवान असते कारण ती एकदा गेली, की परत येत नाही आणि नंतर केलेल्या कामांची किंमतही राहत नाही.स्वतःच्या वेळेचा मान राख आणि इतरांच्याही.नेहमी दिलेली वेळ पाळा आणि पाळता येत नसेल ,तर तशी स्पष्ट कल्पना द्या.
वेळेचा सन्मान कराल,तर वेळही तुमचा सन्मान करेल.वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो.कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही. वेळेचेही असेच आहे.म्हणून हातात असलेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करा आणि आयुष्य सुखी बनवा.

तुमचा वेळ तुमच्याच हातात:

रोजच्या कामांची आधी यादी तयार करण्याची सवय लावून घ्या.कामाचं योग्य नियोजन केलं,तर वेळ वाचवता येतो.महत्वाची कामे,तातडीची कामे ,नंतर करता येऊ शकतील अशी कामे,यानुसार कामांची वर्गवारी करा.कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्या.त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही याची काळजी घ्या.कमी वेळात ते काम करून वेळेची बचत करा. काही कामे हि रोजचीच असतात.सवयीने ती कामे कमीतकमी वेळात कशी होतील याचा विचार करा.

शिल्लक वेळेचा सदुपयोग:

वाचलेला वेळ अनपेक्षित अशा नव्या कामांसाठी देता येईल.काम नसेल, तर वेळ रिकामा घालवू नका, दुसरं कोणतंही काम करा. नव्या कामांसाठी त्यामुळे वेळ हाताशी शिल्लक राहतो .

हे ही वाचा : Love Status in Marathi