नव्या धोरणावर अश्या प्रकारे काम करा.
ध्येय निश्चित केल्यानंतर लवकरात लवकर त्या दिशेने पावले उचला.त्यासाठी रोज काही ना काही पाऊल टाका. यामुळे आपण ध्येयाला बांधलेलो आहोत असे वाटेल.
स्वतःशी प्रामाणीक राहा:
आपण योग्य दिशेने जात आहोत कि नाही,याविषयी स्वतःशी खोटे बोलाल तर आपलेच नुकसान होईल.ध्येयाच्या दिशेने जात नसाल तर जाण्यासाठी कोणता बदल करायला हवा हे स्वतःला विचारा.
स्वतःला बदला:
ध्येय प्राप्तीनंतर आपल्याला का व्हायचे आहे याची कल्पना करून तसे होण्याचा निश्चय करा.यामुळे आपल्या जीवनात बदल घडू लागेल.
कधीही हार मानू नका:
जरी परिस्थिती कठीण झाली तरी हार न मानता रचनात्मक दृष्टीकोन स्वीकारून ध्येय गाठण्याच्या नव्या पद्धती शोधा, प्रसन्नता राहील असे काही ना काही करीत राहा. काम मजेशीर बनवा, मार्ग ठरत जाईल.
हे ही वाचा : Good Night Messages Marathi