डेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा
आज एखाद्या मुलीसोबत डेटिंगला जुन्यात काहीच अवघड राहिलेले नाही. तुमची हि भेट कायम समरणात राहावी यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
१) आवड-निवड लक्षात घ्या : जर तुम्ही पहिल्यांदाच डेटिंगला जात असाल,तर तुमच्या पार्टनरबद्दल छोट्यातील छोटी गोष्ट म्हणजे त्याला/तिला आवडणारी एखादी गोष्ट तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
२) जागेची निवड:बरेच जण डेटिंगला जाण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतात, तर खूप गॅरी असलेल्या ठिकाणाची निवड करू नका. यामुळे तुम्हाला एकांतात वेळ घालवण्यासाठी त्रास होऊ शकतो. खूप एकांत असलेल्या ठिकाणाची निवडदेखील करणे टाळावे.
३) खाण्याची ऑर्डर देण्यापूर्वी :डेटिंगला गेल्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार असाल, तर जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वी आपल्यासोबत आलेल्या जोडीदाराला कोणते पदार्थ आवडतात याबद्दल विचारा.जर समोरच्या व्यक्तीला नॉनव्हेज अथवा अल्कोहोलिक पदार्थ आवडत नसतील,तर अशा पदार्थाची ऑर्डर देणे टाळावे. यामुळे तुमची इमेज चांगली आणि काळजी घेणारी व्यक्ती म्हणून होण्यास मदत होईल.
४) समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या:डेटिंगला गेल्यानंतर बरेच जण जोडीदाराचे बोलणे ऐकून घेत नाही.जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारल्यास योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा.मोठ्याने बोलणे टाळा.
५) भेटवस्तू घेऊन जा:पहिल्या भेटीला जाण्यापूर्वी आपल्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू घेऊन जा.
हे ही वाचा : Good Morning Message in Marathi