टिकवून ठेवा आपले चमचमते तेज

आरोग्य ज्ञान

पपई : पपईच्या  एक कप चौकोनी तुकड्यात ७० कलरी ऊर्जा  असते. पिकलेली वा कच्ची पपई नेहमी खाल्ल्यास पचन व्यवस्थित राहाते व बद्धकोष्टता नष्ट  होते.
सुरुकुतलेल्या  चेहरयासाठी थोडेसे थेंब मध पपईत मिसळून चेहरयावर वीस मिनिटे लावून ठेवावे व थंड पाण्याने धुवावे.
द्राक्षे  : ३० ग्राम द्राक्षांमध्ये १६ कलरी ऊर्जा असते. द्राक्षाच्या रसात मधाचे थोडेसे थेंब मिसळून चेहरयावर लावल्यास चेहरा तुकतुकीत राहतो व रंगही उजळतो .

टिकवून ठेवा आपले चमचमते तेज
टिकवून ठेवा आपले चमचमते तेज

कलिंगड : कलिंगडाच्या एका फाकेत ४० कलरी ऊर्जा असते. टरबूजाचा रस पंधरा मिनिटे चेहरयावर लावून ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहरा तेजस्वी दिसतो .
लिंबू : लिंबामध्ये २० कलरी ऊर्जा असते. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास स्थूलता दूर होते. पोट साफ राहाते पोटाचे विकार दूर होतात. चेहरयावर  चमक येते.
केळी : १०० ग्रॅम केळांमध्ये ११६ कलरी ऊर्जा असते. चेहरा काळवंडला असेल टर केळाचा लेप नियमित लावल्यास चेहरा चमकदार व तुकतुकीत होतो. केळीचा उपयोग अन्न म्हणून होतो.
संत्री : ९० ग्रॅम संत्र्यामध्ये ४० कलरी ऊर्जा व १० ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. संत्र्याच्या वाळलेल्या सालींचा चुरा, एक चमचा बेसन, कच्चे दुध, हळद, थोडीशी मलई एकत्र करून चेहरयावर व मानेवर लावावी.
 २० मिनिटानंतर कोमात पाण्याने चेहरा धुवावा व थोडेशे मॉईशचरायझर लावावे.  

 

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Love Quotes in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल.

Leave a Reply