लागली कुणाची उचकी….
साधारण: उचकी लागली की, आपण म्हणतो कोणीतरी आठवण केली असेल म्हणून उचकी लागली. मग एकेकाचे नाव घेतले जाते. ज्याने आठवण केली असेल त्याचे नाव घेतले की, उचकी थांबते असा समाज आहे; पण विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, उचकी लागणे हि काही फारशी गंभीर गोष्ट नाही. प्रत्येकालाच कधी ना कधी उचकी लागतेच आणि काही वेळाने ती आपोआप बंदही होते.
मानवी शरीरात पोट आणि छाती यांना विभाजित करणारा एक पडदा असतो. या पडध्यावर ताण पडल्याने उचकी लागते. यामागे अनेक कारणे आहेत, जसे प्रमाणाबाहेर भोजन करणे, अधिक मसालेदार भोजन करणे, अतिशय गरम चहा पिणे इत्यादी. शिवाय अधिक मद्द्पान, सतत हसणे व रडणे यामुळेही उचकी लागू शकते.
शारीरिक रचनेच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यामध्ये निर्माण झालेल्या तात्पुरता अडथळा हे उचकी लागण्याचे प्रमुख कारण आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे हे देखील उचकी लागण्याचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे उचकी लागली कि पाणी पिण्यास सांगतात आणि ग्लासभर पाणी पिताच बहुधा उचकी थांबते.
लागलेली उचकी बंद व्हांवी यासाठी केले जाणारे काही उपयुक्त घरगुती उपचार- पुदिन्यात साखर घालून खाणे, मध चाटणे, उकडलेल्या तांदळात तूप घालून खाणे इत्यादी. जर्मनीतील एका शास्त्रज्ञाच्या अनुसार उचकी लागायला सुरुवात होताच साखर खावी. उचकी लगेच थांबते. दोन्ही कानात बोटे घालून दाब दिला असता उचकी थांबते.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Love Quotes in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल.