स्वत:कडेही लक्ष द्या

आरोग्य ज्ञान

हल्लीच्या जगात आपण सारखे धावत असतो, पळत असतो. स्वत:कडे नीट लक्ष दयायलाही पुरेसा वेळ मिळत नाही. या धावपळीत कधीतरी काहीतरी लागतं, अचानक कधी तरी, कुठे तरी आपण आपटतो,  पडतो… पण, त्याकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. शिवाय , काही वेळा त्याची गरज वाटत नाही. अशा दुखण्यांची पूर्ण चिकिस्ता आणि पुढे जाऊन त्रास होणार नाही, याची खात्री करून घेण्यासाठीची खबरदारी घेतली जातेच, असंनाही. कालांतराने झालेल्या दुखापतीची वेदना कमी होऊन नाहीशी झाली कि , ते दुखणं आणि त्या दुखण्याचं कारणही आपण विसरून जातो, असा अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतो. 

स्वत:कडेही लक्ष द्या
स्वत:कडेही लक्ष द्या

 

अशा दुखण्यातलं सगळ्यात महत्त्वाच दुखणं म्हणजे सांधेदुखी. अनेकदा एखादा सांधा खूप दुखत असतो. कालांतराने दुखणं थांबत. वेदना थांबल्या कि दुखणं बरं झाल्याची खात्री होते. आपण तो त्रास विसरूनही जातो. पण, काही वर्षांनी हे दुखणं पुन्हा डोकं वर काढत .

Leave a Reply