इअर स्पायमुळे लपून दुसऱ्याचे बोलणे ऐकणे शक्य
इअर स्पायमुळे लपून दुसऱ्याचे बोलणे ऐकणे शक्य
स्मार्टफोन साठी बनविली जात असलेली अनेक अँप असे चमत्कार दाखवत आहेत. स्मार्टफोनसाठी बनलेली हेरगिरी किवा जासुसि apps हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
गुगलच्या प्ले स्टोअरवर अशी सात ॲप उपलब्ध आहेत. अल्ट्रा स्पी कॅमेरा हे असेच एक ॲप असून याच्या मदतीने हाय क्वालिटी फोटो दुसऱ्याच्या नकळत काढता येतात. म्युट करूनही हा फोन वापरता येतो तसेच स्क्रीन डिस्प्ले न करताही हे अँप सुरु करता येते. automatic call recorder app च्या सहायाने येणारा तसेच केलेला प्रत्येक call रेकॉर्ड करता येतो. व नंतर ऐकता येतो. या सर्व calls ना पासवर्डही घालता येतो त्यामुळे आपला फोन दुसऱ्याने घेतला तरी आपली प्रायव्हसी कायम राखता येते. आयपी कॅम व्ह्युअर लाईट ॲप मुळे आपल्या जवळपास छुपा कॅमेरा असेल तर त्वरित समजू शकते.
remote call sms tracker ॲपच्या मदतीने आपले call आणि sms कुठूनही track करता येतात, app lock apps च्या सहाय्याने आपल्या स्मार्टफोन वर कोणकोणती ॲप आहेत हे दुसऱ्यांना समजणे अवघड बनते तर spy call recorder च्या सहाय्याने आपण कुणाचेही बोलणे mp३ format मध्ये सेव्ह करू शकतो. mspy मुळे स्मार्टफोनचा वापर मायक्रोफोनसारखा करता येतो ज्यांचे बोलणे आपल्याला समजावे असे वाटते तेथे हा फोने फक्त ठेवायचा आपण तेथील सर्व संभाषण ऐकू शकतो. तर इअर स्पाय मुळे लपून छपून दुसऱ्याचे बोलणे ऐकणे शक्य होते.