नैराश्यामुळेही अकाली वृद्धत्व येते.
कोणालाही असे वाटत नसते कि, आपण म्हातारे व्हावे. याच कारणामुळे ब्युटी ट्रीटमेंटसमधील एंटी एजिंग प्रोडक्ट्सची मागणी कधीही कमी तर होतच नाही; परंतु दिवसेंदिवस त्यात प्रचंड वाढच होत आहे; परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का, कि तुम्हाला फक्त काळच म्हातारा बनवत नसतो, तर तुमचे नैराश्यही तुम्हाला वेगाने म्हातारे बनवत असते.
असे मानले जाते कि नैराश्य हे माणसाला मानसिक व भावनात्मक रूपाने कमकुवत बनविते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे कि या समस्यांबरोबर नैराश्य हे म्हातारपण लवकर येण्यासाठी जबाबदार आहे. नेदरल्यांडच्या शास्त्रज्ञांना एका संशोधनात असे आढळले आहे कि, डिप्रेशनमुळे शारीरिक क्षमतांवर वाईट परिणाम होतो व ते शरीरातील पेशींमधील एजिंगची प्रकियाहि वेगवान बनविते. जे लोक गंभीर प्रकारच्या नैराश्याने ग्रस्त असतात ते इतरांच्या तुलनेत वेगाने म्हातारे होतात. हा निष्कर्ष २४०७ लोकांवर करण्यात आलेल्या एका संशोधन पाहणीतून काढण्यात आला आहे. असेही म्हटले जाते कि, माणूस सतत विचार करण्याने म्हातारा होतो; परंतु आता हे मानणे चुकीचे ठरेल की, नैराश्यामुळे व्यक्तीचे केवळ विचारच प्रभारित होतात. नैराश्य हे व्यक्तीच्या आरोग्यावर हि घातक परिणाम करून त्याला अकाली वृद्ध बनवीत असते.