अँलर्जी हाही एक आजारच आहे

आरोग्य ज्ञान

वाढते औद्योगिकीकरण व त्यामुळे सतत वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण यांनी अनेक रोगांना जन्म दिला आहे. त्यातीलच अँलर्जी हि एक समस्या आहे. अँलर्जी हा प्रत्यक्षात कोणताही रोग नसून ती मनुष्याला पिडा देणारी अशी लाक्षणिक शारीरिक प्रवत्ति आहे.
यामुळे मनुष्य नेहमी त्रस्त राहतो. अँलर्जी म्हणजे नेमके काय व ती का होते याची हि थोडी माहिती-
जेव्हा शरीराची प्रतिकारक शक्ती बाह्य प्रभावांना तोंड देऊ शकत नाही व त्याचा परिणाम म्हणून कोणत्या न कोणत्या तरी प्रकारची लक्षणे प्रगत होतात. तेव्हा त्याला आपण ‘ अँलर्जी ‘ म्हणतो. अँलर्जीच्या कारणाबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही; परंतु हा एक प्रकारचा रोग/ विकार आहे हि गोष्ट सर्वच मान्य करतात. आज अँलर्जी या विषयावर जागतिक पातळीवर संशोधन व शोध कार्य सुरु आहे .

अॅलर्जी हाही एक आजारच आहे
अॅलर्जी हाही एक आजारच आहे.
Allergic-Bronchitis-Causes-Symptoms-and-Cure

             आपल्या शरीराच्या सुरक्षा यंत्रणेला आपण घरगुती रखवालदार असे म्हणू शकतो. जसे आपले सिक्युरिटी गार्ड  कोणालाही विनापरवानगी आत येऊ देत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या शरीराची सुरक्षा यंत्रणा वा रोगप्रतिकार शक्ती जेव्हा एखादी बाह्य वस्तू शरीरात शिरण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला विरोध करते. या विरोधामुळे शरीरातील तंतूचे जे नुकसान होते ते अँलार्जीच्या लक्षणांच्या रुपात प्रगत होते. हि बाह्यतत्वे  धूळ, परागकण, हवा, खाद्यपदार्थ व इतर अन्य वस्तूंमध्ये असू शकतात. अँलर्जीवरील उपचार पद्धतीत आपण आजवर एवढीच प्रगती करू शकलो आहोत कि आता लोक असे मान्य करू लागले आहेत की, अँलर्जी हा एक प्रकारचा रोग आहे.
बऱ्याचदा असे पाहावयास मिळते की एकाच परिवारातील बऱ्याच सदस्यांमध्ये एकाच प्रकारच्या अलर्जीची लक्षणे आनुवंशिक नसतात व त्यामुळे होणारे रोगही आनुवंशिक नसतात; परंतु अँलर्जीची प्रवृत्ती आनुवंशिक असू शकते. काही लोकांमध्ये अॅलर्जीची प्रवृत्ती जन्मापासूनच असू शकते; परंतु त्यांचा जन्म झाल्यानंतर अँलर्जीची लक्षणे दिसतील असा काही नियम नाही. सामन्यत: जन्मानंतर सहा महिन्यांपासून जीवनभर कधीही अँलर्जीची लक्षणे निर्माण होऊ शकतात .
           जर माता-पिता दोघांनाही अँलर्जी असेल, तर ५२ टक्के मुलांमध्ये ती प्रवृत्ती असू शकते व फक्त एकालाच अँलर्जी असेल तर ३८ टक्के मुलांमध्ये ती प्रवृत्ती आढळते. जवळजवळ २० टक्के लोकांना आपल्या आयुष्यभरात कधी न कधी तरी अँलर्जीचा त्रास होतोच. प्रोफेसर जोहान्सरिंग तसेच अन्सर्ड  ऑगस्टस्टेमला  म्हणतात की, एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्तींना परस्पर संसर्गामुळे एकमेकांच्या अँलर्जीची लागण होऊ शकते. मानसिक राग व्यक्त करणाऱ्या रुग्णांमुळे  त्यांच्या मुलांना अँलर्जीचा त्रास होऊ शकतो.  अँलर्जीमुळे आरोग्यावर फारच घटक परिणाम होतो. अँलर्जीने पिडीत व्यक्तीला गंभीर रूपाने आजारी नसतानाही काम करण्यात अनेक अडथळे येतात.

Leave a Reply