तुम्ही जॉबला किती गांभीर्याने घेतात ?
स्वत:ला एक सक्षम कर्मचारी म्हणून सिद्ध करतात किंवा नियमितपणे ऑफिसला जाऊन केवळ दिलेले काम करतात ? हे पुढे दिलेल्या काही खास लक्षणावरून स्पष्ट होईल .
जॉबविषयी बोलणे :
तुम्ही आपल्या जॉब विषयी बोलताना थोडेशे गोंधळून जातात किंवा त्याबाबत बोलताना तुमचे शब्द अडखळतात, असे घडत असल्यास त्याचा अर्थ असा होतो कि तुम्हाला तुमच्या कामात काहीही रुची नाही . याउलट जॉबविषयी बोलणे सुरु झाले कि तुमचा चेहरा खुलतो आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावाण्याकरिता प्रयत्न करत असतात त्यामधून समोरच्या व्यक्तीला समजते कि तुम्हाला तुमच्या जॉबबद्दल खूप प्रेम आहे .
कौशल्याचा वापर करणे :
जेव्हा ऑफिसमध्ये आपली प्रतिभा आणि कौशल्याचा पुरेपूर उपयोग होत असेल आणि आपली पात्रतासिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळत असेल, अशाप्रसंगी तुम्ही काम गांभीर्याने करत असतात. कारण त्यामध्ये जराही शंका नसते.
चांगले अनुभव :
जर तुमचा जॉब तुम्हाला सकारात्मक आणि आशावादी बनवीत असेल तर त्यामधून हे स्पष्ट होते कि तुम्ही तुमचे काम एन्जॉय करत असतात आणि ते गांभीर्याने घेत असतात. याउलट आपले मनोधैर्य कमी करणाऱ्या कामाला कोणीच गांभीर्याने घेत नाही.
सॅलरी प्रभाव :
तुम्हाला तुमच्या कामातून चांगली सॅलरी मिळत असेल तर अशा कामाची तुम्हाला तीव्र आवड निर्माण होते.तसेच तुम्ही असे काम गांभीर्याने करू शकतात. याउलट तुम्हाला केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर तुम्ही असे काम गांभीर्याने करू शकणार नाहीत.
काम मिस करणे :
अनेक लोक आपले काम खूप एन्जॉय करतात . हे लोक सुट्टीवर असले तरीदेखील आपल्या कामाबद्दल विचार करत असतात. ते नेहमीच आपले काम मिस करत असतात हेदेखील गांभीर्याने काम करत असल्याचेच एक परिमाण आहे.
काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.