या हॉटेलात वेटर नाही तर रोबोट देतात सेवा!

लाइफस्टाइल

या हॉटेलात वेटर नाही तर रोबोट देतात सेवा!
भविष्यकाळामध्ये हॉटेलमध्ये काही खाण्यासाठी गेलात तर तेथे तुम्हाला सर्विस देण्यासाठी वेटर नसतील. तेथे रोबोट तुम्हाला हव्या त्या दिश आणून देतील. अगदी तुमची ऑर्डर घेण्यापासून भटारखाण्यात जाऊन ती डिश बनवून तुमच्या टेबलवर गरमागरम सर्व्ह करण्यापर्यंतची सर्व कामे हे रोबोट मंडळीच पार पाडतील. एक बरे आहे हि मंडळी टीप नाही दिली तरी तोंड वाकडे करणार नाहीत!

लंडन येथील रोबोट रेस्टॉरंटमध्ये या रोबोट सेवेची सुरवात झाली आहे. या रेस्टॉरंटमध्ये सध्या १८ प्रकारचे रोबोट काम करीत आहेत. येथे ऑर्डर  घेण्यापासून तो पदार्थ तयार करणे व तुम्हाला सर्व्ह करणे हि सर्व कामे रोबोटच पार पाडतात. या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच तेथील रोबोट तुमचे स्वागत करतो. तुम्ही ऑर्डर  दिल्यानंतर रोबोट किचनमध्ये जातो व तुम्ही दिलेल्या ऑर्डरनुसार स्वत:च अन्नपदार्थ तयार करतो. तसेच डिश तयार झाली कि, तुम्हाला ती गरमागरम सर्व्हही करतो.

Robots Cook and Serve Food
Robots Cook and Serve Food

या  रेस्टॉरंटमध्ये  काम करणारे रोबोट चीनच्या एका कंपनीने बनविले आहे. हे रोबोट्स पूर्णपणे कॉम्पुटरद्वारे संचालित आहेत. येथील या रोबोट वेटर्सची कमाल पाहण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये  मोठ्याबरोबरच मुलेही उत्सुकतेने गर्दी करीत आहेत. ही मुले रोबोट काय करतात, याकडे  बघत बसतात. त्यांना खाण्यापेक्षा रोबोटमध्येच जास्त इंटरेस्ट वाटतो.

हे हि वाचा : Amazon Quiz Answers Today

Leave a Reply