गरिबी व स्वाभिमान दोन टोके

लाइफस्टाइल

स्वप्न हि वाऱ्यावरची भूत आहेत. जी आजपर्यंत कुणालाही जिंकता आलेली नाहीत. माणूस मात्र बावळा आहे .
खूप स्वप्न रंगवतो. गणितांची आकडेमोड करतो ; परंतु हि स्वप्न केव्हा वाऱ्यावर विरून जातात ते कळतहि नाही.
गरिबी…! गरिबी म्हणजे फाटका संसार! रोज कष्ट करावेत. तेव्हा कमवून आणून खांव. दारिद्र्यरेषेच्या आतच जगावे आणि आतच मरांव.
आजपर्यंत या दारिद्र्य रेषेत अनेक पिढ्या संपल्या, मातीत मिसळल्या, आज मात्र जो ज्ञान मिळवतो तोच हि दारिद्र्यरेषा पार करून श्रीमंतीकडे पाऊल उचलू शकतो. अज्ञानाला गरिबी खूप आवडते.

गरिबी
गरिबी

“सारी फाटकी वस्त्रे गुंडाळून अज्ञान माणसाला सैरावैरा फिरवते. या अज्ञानाला त्याचं काहीही वाटत नाही. ज्यांनी ज्ञान स्वीकारलं. शाळेत जावून ज्ञानाची भाषा घोकली “
त्या ज्ञानाच्या जोरावर मानून आज मध्यमवर्गावर येऊन ठेपलेला आहे. या मध्यमवर्गाची अवस्थाही आज ना घर का ना घाट का सहन करणारी हि मध्यमवर्गीय मंडळी जी कर्ज फेडून आणि व्याज भरून भरूनच मारून चालली आहेत. काय करतोय, कुठे चाललोय याचा थांगपत्ताच लागेना.
स्वाभिमान! स्वाभिमान म्हणजे अभिमानाचा धाकटा भाऊ. या स्वाभिमानाच आणि गरिबीचं केव्हाच पटत नाही.
दोघ एकत्र नांदुच शकत नाहीत. कारण गरिबाला दामटायला सतरा बाप असतात अस असताना स्वाभिमानाने कुणाच्या घरची पेंड खावी?
गरिबीला लाज नसते. ती सारखी माणसाला उघडी पाडते. अशा वेळी स्वाभिमान कुठल वस्त्र सावरणार?
आज दारिद्र्यरेशेतून वर यायचे असेल, तर एकच साधन आपण वापरू शकतो ते म्हणजे ज्ञान! मुलाबाळांना शिकवा.
 कष्टाचा गाडा बालपणी ओढू देऊ नका. दिवस घर बांधून राहत नाहीत. दिवस निघून जातात. जाणाऱ्या दिवसाला मोल द्याव लागत.
ते मोल ज्ञानामृत पाजून व्यक्त करा. आपण नाही सुधारलो निदान आपली पुढची पिढी तरी सुधारावी.  हीच प्रगतीशील अवस्था पार पाडण्यासाठी ईश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे.
तो जन्म सार्थकी लावा. कारण झाडाच्या रोपाला खतपाणी घातलंतरच ते वाढेल अन्यथा ते रोप जळून जाईल. परिणामी स्वाभिमान शिवायलाही जवळ येणार नाही.

Leave a Reply