जितके यशाच्या जवळ जावे तितके ते आपल्यापासून दूर का पळते ?

लाइफस्टाइल

बरेचवेळा असे होते कि तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेत असता ; पण तरीही तुम्हाला पाहिजे तसे काम होत नाही , यश मिळत नाही . त्याचे नेमके कारण देखील तुम्हाला लक्षात येत नाही. ती करणे काय असू शकतात ती खालीलप्रमाणे , त्यावर नक्की विचार करा कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्रांचे उत्तर मिळेल. 

गोष्टी मनात ठेऊ नका :  बरेच लोक स्वतःला होणार त्रास बोलून दाखवत नाहीत. त्यांना असे वाटते कि आपल्या दुःखाबद्दल, अस्वस्थतेबद्दल बोलू नये त्याविषयी कोणाला काही बोलू नये. त्या गोष्टी मनात दाबून टाकतात पण असे करू नका कारण त्याचा परिणाम तुमच्या कामावर होत असतो जरी तुम्ही काम करण्यात कुशल असाल पण मनाने स्वस्थ नसाल तर तुमचे काम तुम्हाला हवे तसे होणार नाही. तुम्हाला खरंच मदतीची गरज असेल तर तसे बोलून दाखवा.

जितके यशाच्या जवळ जावे तितके ते आपल्यापासून दूर का पळते ?

प्रत्येकाने स्वतःला होणार त्रास बोलून दाखवायलाच हवा. गोष्टी मनात दाबून ठेवण्याचा परिणाम कामावर होत असतो.

जरा थांबा : काम करत असताना जरा ब्रेक घ्या सतत काम केल्याने शिथिलता येते, त्याचा कामावर देखील परिणाम होतो. ब्रेकमध्ये कामाविषयी शक्यतो विचार करू नका. मेंदूला  जरा आराम द्या. जेव्हा तुम्ही पुन्हा काम सुरु कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका आपोआप लक्षात येतील. तसेच काम अधिक चांगले आणि  जलद गतीने करण्याच्या नवनवीन शक्यता तुम्हाला कळू शकतील .

तक्रारी करत बसू नका : अनेक लोक सतत लहानसहान गोष्टींवर वैतागत असतात. चुकांचे खापर दुसऱ्या व्यक्तीवर फोडत राहतात ; पण यातून काहीच सध्या होत नाही. सर्वात प्रथम अशा तक्रारी करणे थांबवा ज्या निरर्थक आहेत. वेळ न घालवता, स्वतःचे फाजील लाड न पुरवता सरळ उठून कामाला लागा.

दुसऱ्याशी सतत तुलना करू नका : आपण काम करत असताना सतत कोणाशी नि कोणाशी  स्वतःची तुलना करतो त्यामुळे मनात ईर्षा, मत्सर तयार होतो त्या नांदत आपण आपल्याच कामात चुका करून ठेवतो

छोट्या अडचणीकडे दुर्लक्ष करू नका: रोजचा दिवस घालवत असताना वेळोवेळी अनेक छोट्या- मोठया समस्या निर्माण होतात त्या त्या वेळी समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्या हातावेगळ्या करून टाका. बरेचदा साधी गोष्ट त्रासदायक बनते जी तुम्हाला ध्येयपूर्तीपासून वंचित ठेवते.

हे ही वाचा : Attitude Shayari in Hindi