यश मिळवण्याचे महत्त्वाचे ६ मूलमंत्र

लाइफस्टाइल

१) आत्मविश्वास : हा यशाचा पाया आहे. तो नसेल तर यश मिळवण्याचा विचारसुद्धा करता येणार नाही.
२) एकाग्रता आणि ध्यास : आपलं काम कोणतीही सबब न सांगता चित्त एकवटून केलं पाहिजे. तुम्ही कामाच्या ध्यासानं झपाटून गेलात तरच उत्तम दर्जाच काम करू शकतो. तनमन अर्पुनच काम केलं पाहिजे.
३) टीका पचवता आलीच पाहिजे: तुमच्या कामाची प्रशंसा करणारे लोक असतात,तसे त्यावर टीका करणारेही असणारच, हे कायम लक्षात ठेवा. टिकेमध्ये तथ्य असेल, तर तिची जरूर दखल घ्या.
हेव्यादाव्यापोटी   केलेल्या निंदेकडे  साफ दुर्लक्ष करा आणि मन:पूर्वक आपलं काम करत राहा.आपल्या कार्यक्षेत्रात येणारी नवी कौशल्यं शिकून घ्या.

यश मिळवण्याचे महत्त्वाचे ६ मूलमंत्र
यश मिळवण्याचे महत्त्वाचे ६ मूलमंत्र

४) कामाचा आणि जीवनाचा मेळ हवा : दोन्ही तुमच्या जीवनाचे अभिन्न व अत्यावश्यक, महत्त्वपूर्ण हिस्से आहेत. दोघांना स्वतंत्र ठेवा; पण दोघांकडे संपूर्ण लक्ष द्या.
कामात इतके अडकून पडू नका, कि  कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला वेळ हातात राहू नये.
५) प्राधान्य आणि पाठपुरावा : कामातल्या अधिक महत्त्वाच्या आणि तातडीच्या भागांना प्राधान्य द्या. ते पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करा. लोकांना वेळेवर सर्व्हिस देण्याइतकं महत्त्व अन्य कोणत्याच गोष्टीला नाही.
६) उद्दिष्ट पक्कं करा : आपली अनेक स्वप्नंव आकांक्षा असतात; पण ती सगळी पूर्ण होणं अशक्य असतं. स्वत:च्या शक्यता, सामर्थ्य व मर्यादा लक्षात घेवून आपल्या कोणत्या आकांक्षा
 व स्वप्नं पूर्ण होण्यासारखी आहेत याचा अंदाज घ्या. त्यानुसार कोणतं काम करायचं हे ठरवा, आणि ते ठरवलं कि स्वत:ला कामात झोकून द्या.    

हे ही वाचा : Romantic Quotes in Hindi

Leave a Reply