खर्चाचे नियोजन गरजेचे

लाइफस्टाइल

पैसे कमावण्यासाठी खूप वेळ  लागतो . थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणीप्रमाणे पैसा जमा करावा लागतो. मात्र पैसा खर्च करायला काहीही वेळ लागत नाही. म्हणूनच खर्चाचेही नियोजन केले पाहिजे.  सुरुवातीला हि बाब कठीण वाटेल, पण हळूहळू  त्याची सवय झाल्यास ती सरावाने अंगवळणी पडेल .
खर्चाचा हिशोब  ठेवा :

खर्चाचे नियोजन गरजेचे
खर्चाचे नियोजन गरजेचे
  • प्रत्येक महिन्याचे नियोजन करून आपण केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवणे गरजेचे आहे. हिशेब ठेवल्याने खर्चाचा अंदाज येतो. खर्चाचा हिशेब ठेवल्याने वायफळ खर्च कुठे होते आहे. हे चटकन कळते.
  • आपल्या आवाक्यामधील  एक भाग आपण बचत म्हणून बाजूला ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला खर्चाचा अंदाज तर येइलच, शिवाय बचतही करता येईल .

लक्ष्य निर्धारित करा :

  • आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी  खर्चाला लगाम घातला पाहिजे त्यामुळे डोळ्यासमोर लक्ष्य ठेऊन नियोजन केले पाहिजे.
  • आपल्या आवाक्यानुसार आपल्याला कोणत्या किमती वस्तू खरेदी करायच्या आहेत, याचे नियोजन केले पाहिजे, त्यानुसार आपले बजेट निर्धारित करून त्या वस्तूची खरेदी केली पाहिजे.

Leave a Reply